रुग्णवाहिकेतच झाली प्रसूती , पाचाड आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांच्या तत्परतेमुळे महिला व बाळ सुखरूप

रुग्णवाहिकेतच झाली प्रसूती ,
पाचाड आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांच्या तत्परतेमुळे महिला व बाळ सुखरूप



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अलिबाग प्रतिनिधी; सचिन पाटील

रायगड: ग्रामीण भागातील महिलांसाठी शासनाच्या असलेल्या आरोग्य विभागाच्या योजनांचा लाभ तत्परतेने झाल्याचा एक सुखद अनुभव रायगड विभागातील जनतेला गेल्या आठवड्यात आला.

रायगड विभागातील नांदगाव बुद्रुक येथे राहणा-या तृप्ती अनिल वाडकर यांना मागील आठवड्यात पोटात अचानक दुखू लागल्याने त्यांनी स्थानिक आशा सेविकेंच्या मदतीने पाचाड आरोग्य केंद्रांतील सिस्टर साै.सना मुजावर यांच्याशी संपर्क साधून तातडीने बोलावून घेतले यावेळी संबंधित महिलेची तपासणी केली जात असतानाच पोटदुखीचा त्रास वाढू लागल्याने तातडीने रुग्णवाहिकेतून पाचाड आरोग्य केंद्रात देण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र तळोशी गावाजवळ जाईपर्यंत त्रास वाढू लागल्याने संबंधित सिस्टर सौ मुजावर यांनी डॉक्टर सृष्टी शेळके यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून महिला रुग्णांची हकिकत कथन केली असा त्याच परिसरात असलेल्या डॉक्टरांनी तातडीने रुग्णवाहिकेतच त्या महिलेची असलेली स्थिती लक्षात घेऊन पुरेसे साहित्य उपलब्ध नसतानादेखील आणीबाणीच्या परिस्थितीत प्रसूतीची सर्व प्रक्रिया पूर्ण केली.

यानंतर संबंधित महिला व तिच्या बाळाला पाचाड आरोग्य केंद्रात दाखल केले असून दोघांचीही प्रकृती सुरक्षित व ठीक असल्याची माहिती पाचाड आरोग्य केंद्रातून देण्यात आली आहे .

शासनाच्या ग्रामीण भागातील महिलांच्या गरोदरपणासाठी असलेल्या विविध योजना तसेच रूग्णवाहिकेची तातडीने झालेली उपलब्धता व आरोग्य कर्मचार्यांनी दाखवलेली तत्परता डॉक्टरांनी गंभीरता ओळखून केलेल्या कामाचे रायगड विभागासह तालुक्यातील शासकीय यंत्रणांकडून कौतुक होत असून संबंधित महिला व व बाळाबाबत केलेल्या कार्यवाही बद्दल आरोग्य विभागाच्या संबंधित डॉक्टर सृष्टी शेळके ,सिस्टर सना मुजावर, चालक अनंत अवकिरकर, साक्षी लांमजे, अंकिता गायकवाड, आशा सेविका निशा कळंबे ,अंगणवाडी मदतनीस चंद्रकला वांगणी, दिगंबर खैरकर या सर्वांचे विभागातून अभिनंदन करण्यात येत आहे .

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles