
तालुका स्तरावर ग्राहक तक्रार निवारण समिती गठीत करावी
_अखिल भारतीय ग्राहक पंचायत हिंगणा तालुका पदाधिकारी यांची मागणी_
गजानन ढाकुलकर
हिंगणा – महाराष्ट शासनाचे परिपत्रक क्र.1996 /77 /प्र.क्र.8/18 अ 13 मार्च 1996 नुसार प्रत्येक तालुक्या मध्ये तालुका ग्राहक तक्रार निवारण समिती मा.तहसीलदार यांनी स्थापन करण्यात यावी त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी तालुका स्तरीय अधिकारी व समिती सदस्य यांच्या सहकार्याने सोडविल्या जातील.
कोरोना काळापूर्वी तत्कालीन मा.तहसीलदार साहेब हिंगणा यांनी तक्रार निवारण समिती स्थापन केली होती.व नियमित महिन्यातून एकदा तालुका कार्यालयात अधिकारी व समिती पदाधिकारी व सदस्य यांची मा.तहसीलदार साहेब यांचे अध्यक्षतेखाली सभा घेण्यात येत होत्या तरी ग्राहकांच्या तक्रारी आपले निदर्शनात याव्या या दृष्टीने आपण सुद्धा तालुका ग्राहक तक्रार निवारण समितीला मान्यता द्यावी या करिता मा.नायब तहसीलदार ज्योती भोसले यांचे मार्फत मा. तहसीलदार प्रियदर्शनी बोरकर यांना अखिल भारतीय ग्राहक पंचायत हिंगणा तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी विदर्भप्रांत कार्यकारिणी सदस्य विनायक इंगळे गुरुजी , तालुका अध्यक्ष गोविंदराव बुधे , संघटन मंत्री मनोज झाडे , कोषाध्यक्ष हरीश आंबटकर , न्याय विभाग ऍड, अर्चना सोनारे , शालिनीताई मनोहर ,ग्रा.प.सदस्य बबलू शेटे ,आरती डोहारे