रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता; मनसेचे तीव्र आंदोलन

रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता;
मनसेचे तीव्र आंदोलनपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर

हिंगणा – आज दिनांक 19 जुलै 2022 ला वानाडोंगरी ते हिंगणा येथील रस्त्यावरून जातानी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मुख्य रस्त्यावरील पूर्ण पथदिवे काढून टाकले त्यामुळे रात्री वाहनधार यांना रस्त्यावर खड्याचा अंदाज येत नसल्यामुळे अपघात होत आहे.

खड्यामुळे गाडी चालवताना मानसिक व शारीरिक त्रास होत आहे. स्थानिक लोक प्रतिनिधी याकडे लक्ष देत नाही. त्यांना लोकांच्या जीवाशी काही घेणे देणे नाही. रस्त्याची पावसामुळे खूप दुर्दशा आहे. तरी पण वाहधारका कडून टोल सर्रास वसुल केल्या जात आहे.

अन्यायाला वाचा फोडण्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंगणा तालुका सदैव तयार असते.2200 कोटी रुपयाचा विकास केला याचा गाजा वाजा येथील आमदार नेहमी करत असतो. विकास हा खड्यात आहे हे दिसून येत आहे. याचा जाहीर निषेध म्हणून बेशरमचे झाडे खड्यात लावून व खड्याची पूजा करून बेशरम लोकप्रतिनिधी चा जाहीर निषेध करण्यात आला. व लवकरात लवकर रस्ता बनवा अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असे या प्रसंगी सांगण्यात आले.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सतीशभाऊ कोल्हे, तालुका अध्यक्ष दीपक नासरे, जिल्हाउपाध्यक्ष सचिन चिटकूले,वाडी ग्रामीण तालुका अध्यक्ष अनिल पारखी, तालुका संघटक वाडी दीपक ठाकरे,हिंगणा विधानसभा संघटक गुड्डू पारधी, हिंगणा विधानसभा सचिव नंदू पोटे, वानाडोंगरी शहर अध्यक्ष निलेश भुरसे, तालुका चिटणीस वाहतूक सेना महेश शाहू,वानाडोंगरी शहर संघटक योगेश टोंगे,तालुका संघटक शुभम भोकरे, तालुका सचिव वैभव मुळे, तालुका उपाध्यक्ष सागर भेंडे, तालुका उपाध्यक्ष समीर कांबळे, तालुका उपाध्यक्ष माधवराव राणे,शैलेश भाऊ सोनोने, राजेश कावळे, राजू वांदे, शुभम खापरे, सुरज लटारे, ऋषीं पोपटकर, रामचंद्र मदनकर,बबलू भाऊ सिंग, अजिंक्य वाघमारे,मनोज पाठे, विशाल जिवतोडे, ओंकार तलमलें , नितेश लांजेवार , अतुल आंबूले ,राहुल हूड ,धीरज , दौलतभाऊ डांगरे ,अश्विन जांभुळकर ,राजन कृष्णन , नवराज उके , शिवकुमार आंबटकर , सुनिलभाऊ हिवसे ,आरिफ शेख महिला सेनेच्या अफसाना ताई पठाण,प्रियंका शंभरकर, लता जाधव, रंजना टेटे असंख्य मनसे कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles