
न्यू मून इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
प्रकाशवाट दाखवणारा मार्गदर्शक दीपस्तंभ; यशवंत परशुरामकर
गोंदिया: गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी न्यू मून इंग्लीश मिडीयम स्कूल अर्जुनी मोरगाव येथे गुरुपौर्णिमा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष यशवंतजी परशुरामकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रामुख्याने उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून श्री. अंकील शुक्ला, श्री. निलेश लबडे धीरसागर, श्री शालीक हालझाडे यांची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी माला सरस्वती व ओमकाराचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यात रिद्धी यावलकर वर्ग ५वा हिने गुरुप्रती आपली श्रद्धा भाषणातून व्यक्त केली. तर सौ लिना चचाने हयांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. परशुरामकर सर यांनी अध्यक्षीय भाषणातून-गुरु शिष्यांसाठी पथदर्शक असावा व दीपस्तंभ ठरावा, ज्याच्यामुळे आयुष्याचं चंदन होते, झानासोबतच जो संस्कारधडे मनावर बिंबवतो व आत्मविश्वासाची मशाल मनात पेटवून जीवन प्रकाशमान करतो अशी गुरुप्रती शब्दसुमने अर्पण केली. “या निमित्ताने शाळेच्या आवारात वृक्षाचं रोपन करून वृक्ष संवर्धनाचा सुंदर आदर्श विद्यार्थ्यासमोर ठेवण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सचीन मेश्राम. प्रा. तारका रुखमोडे सौ भुनेश्वर, कु· बडवाईक, कु. राऊत, सौ बोरीकर यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राकेश उंदिरवाडे यांनी केले व आभार कु. हिना लांजेवार यांनी मानले.