सीबीएसई 12 वी पास होणाऱ्या विद्यार्थीची प्रवेश व्यवस्था कशी करणार? याकरिता cyss कडून मा कुलगुरु यांना निवेदन

सीबीएसई 12 वी पास होणाऱ्या विद्यार्थीची प्रवेश व्यवस्था कशी करणार? याकरिता cyss कडून मा कुलगुरु यांना निवेदन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_आप’च्या छात्र युवा संघर्ष समिती शिष्टमंडळाला नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुंनी दिली ग्वाही_

नागपूर: सीबीएसईतून बारावी उत्तीर्ण होणारा एकही विद्यार्थी पदवी प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची योग्य ती काळजी घेण्याची हमी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी आम आदमी पार्टीच्या युवा व छात्र युवा संघर्ष समिती शिष्टमंडळाला दिली.

कोविड परिस्थितीमुळे संपूर्ण देशभरातील शिक्षण व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. काही परीक्षा मंडळाचे निकाल विलंबाने जाहीर होत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने सीबीएसई बारावीचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली व आता ती पूर्ण होत आहे. त्यामुळे सीबीएसई बारावीचे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती.

आम आदमी पार्टीच्या छात्र युवा संघर्ष समितीला ही बाब लक्षात येताच नागपूर जिल्हा युवा अध्यक्ष श्याम बोकडे व छात्र युवा संघर्ष समितीचे समन्वयक पार्थ मिरे यांच्या नेतृत्वात युवा उपाध्यक्ष निशाद गोंदे, विष्णू थोरात, सुजेश गाथे, मोहित नीलकुटे, गौरव नाजपांडे, शुभम थोरात, यश माहुले, साहिल ठाकूर, शिवम गौर, आदित्य टाले, करण बोगे, कोमेश तराम यांनी कुलगुरू डॉ. चौधरी यांची भेट घेतली.

सीबीएसई बारावीचे निकाल जाहीर झालेले नाहीत, त्यामुळे विद्यापीठाने यावर तोडगा काढावा, अशी मागणी ‘आप’च्या युवा व छात्र युवा संघर्ष समिने मा डॉ. चौधरी यांच्याकडे केली. नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, असा सुवर्णमध्य या विषयात काढावा, असा आग्रह शिष्टमंडळाने धरला. त्याला सकारात्मक प्रतिसाद कुलगुरू डॉ. चौधरी यांनी सीबीएसई बारावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, असा शब्द दिला. दुसरा मुद्दा पात्रता व स्थलान्तरण प्रमाणपत्रा ची अट रद्द करण्याची विनंती केली आहे.

(नागपुर विद्यापीठ च्या कक्षेत येणारे) अधिकत्तर विद्यार्थी हे (12 वी चे शिक्षण) CBSE बोर्ड मधून घेत असतात. आणि या वर्षी CBSE ची परीक्षा आपल्या विद्यापीठ परीक्षेप्रमाणे उशिरा झाली आहे. त्यामुळे अजून पर्यंत (CBSC बोर्ड चे) १२ वी चे निकार जाहीर होणे बाकी आहे. याची तसदी घेवून दि.१२ जुलै २०२२ ला विद्यापीठ अनुदान आयोग यांनी (CBSC बोर्ड चे) १२ वी चे निकाल आल्याशिवाय प्रवेश प्रक्रिया शुरू करू नये असे आदेश काढले आहेत.(अशी सुचना केली आहे)
याचा आपण गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. कारण बरेच अभ्यासक्रम असे आहेत की त्यांच्या एकूणच जागा कमी आहेत किंवा संपूर्ण विद्यापीठात एखादच कॉलेज आहे (उदा. फोरेन्सिक सायन्स) तेथे जर प्रवेश पूर्ण झालेत तर तेथे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांपेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थांना तेथे प्रवेश मिळणार नाही. म्हणजेच गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांवर अन्याय होईल.

त्यामुळे आता पर्यंत करण्यात आलेली प्रवेश प्रक्रिया रद्द करण्यात यावी आणि CBSE चे (12 वी चे) निकाल आल्यानंतर नव्याने मेरीट लिस्ट तयार करून प्रवेश करण्यात यावेत किंवा ज्या प्रमाणात CBSC विद्यार्थी असतील तेवढ्या जागा प्रत्येक कॉलेज मध्ये प्रत्येक अभ्यासक्रमाला वाढवून द्याव्यात.

दुसरी महत्वाची बाब म्हणजे आता स्टेट व क्रन्द्रीय बोर्ड समकक्ष असल्यामुळे स्टेट बोर्ड ला जे कागदपत्र प्रवेश घेण्याकरिता लागतात तेच कागदपत्र केंद्रीय बोर्ड उत्तीर्ण (महाराष्ट्र राज्या च्या) विद्यार्थ्यांना आवश्यक ठेवावेत. उगाच पत्रात (पात्रता) प्रमाणपत्र आणि स्थलांतरण प्रमाणपत्र मागणी करू नये. स्थलांतरण अट केवळ दुसऱ्या राज्यातून येणाऱ्या विद्यार्थांकारिता ठेवावी. एकूणच विद्यार्थी हित लक्षात घेता खालील निर्णय घ्यावेत.
१. UG प्रथम वर्षाचे सर्व प्रवेश रद्द करण्यात यावेत,
२. UG प्रवेश प्रक्रिया CBSE १२ वी चे निकाल आल्यानंतर सुरु करावी.
३. अन्यथा आता प्रत्येक अभ्यासक्रम व कॉलेज मधील शेवटच्या विद्यार्थांना असलेल्या गुणांपेक्षा जास्त गुण प्राप्त सर्व विद्यार्थांना UG प्रथम वर्षाला प्रवेश देण्याची व्यवस्था करावी.
४. (महाराष्ट्र राज्यातील) CBSE उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता प्रथम वर्षाला प्रवेश घेतांना पात्रता प्रमाणपत्र व स्थलांतर प्रमाणपत्र अट रद्द करण्यात यावी.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles