पाडसूळ येथील पाणी घरात शिरल्याने नागरिक त्रस्त

पाडसूळ येथील पाणी घरात शिरल्याने नागरिक त्रस्त



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

प्रमोद गाडगे

बुलढाणा: पाडसूळ तालुका शेगांव जिल्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये दोन दिवसापासून मुसळधार व जास्तीच्या पावसामुळे शेगाव तालुक्यामध्ये येणारे पाडसूळ येथे अतिरिक्त पावसामुळे काही नागरिकांच्या घरामध्ये पाण्याचा वेढा बसला शेजारील गावातील नागरिक नारायण दाभाडे यांनी आपले स्वतःचे घराची भित पाडून तिथं जवळपास मोठा खड्डा खोदल्याने शेजारील दादाराव पुंडलिक दाभाडे व अन्य काही तीन घरे,यांच्या घरामध्ये पाणी शिरले असता, घरातील सर्व धान्य तांदूळ असो गहू ज्वारी अशा प्रकारचे उदरनिर्वाहाचे सर्व धान्य व वस्तू खराब झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे .

एवढे कृत्य घडूनही गावातील कोणत्याच नागरिकांनी तसेच जबाबदार व्यक्ती सरपंच यांनी पीडित नागरिकांना कुठलीही मदत केलेली नाही.ही बाब लक्षात घेता दादाराव पुंडलिक दाभाडे व काही पीडित नागरिकांनी बिडिओ , तहसीलदार साहेब यांच्याकडे धाव घेतली.सदर वरील बाबी विषयी माहिती दादाराव पुंडलिक दाभाडे व अन्य नागरिक बिडियो देशमुख साहेब यांना निवेदन दिले.

तसेच एक निवेदन तहसीलदार साहेब तथा दंडाधिकारी सोनोने साहेब शेगाव यांनाही दिले तरी तहसीलदार साहेबांनी या घटनेची आज दिनांक 20 जुलै 2022 शहानिशा केली असता, व्यायाम शाळेत नागरिकांची राहण्याची व्यवस्था केली. व लवकरच या समस्येचे निराकरण करू असे पीडित नागरिकांना मदतीचे आश्वासन दिले.तसंच हे कृत्य घडवणारा नारायण दाभाडे हा व्यक्ती फरार आहे. अशी माहिती सतीश दाभाडे यांनी दिली.आम्हाला राहण्यास त्रास होत आहे आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे कुठल्याच प्रकारची आम्हाला गावातून मदत मिळाली नाही. तत्काळ शासनाने आम्हाला मदत द्यावी. व आमचे हक्काचे घर आम्हाला मिळावं अशी पीडित नागरिकांची मागणी केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles