जागतिक दर्जाच्या आयुष्यमान योजनेची सीबीआय चौकशी करा.

जागतिक दर्जाच्या आयुष्यमान योजनेची सीबीआय चौकशी करा.



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची मागणी._

नागपूर : केंद्र सरकारच्या आयुष्यमान योजना मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला असून गरजूपर्यंत ती योजना पोहोचलेलीच नाही उलट आयुष्यमान कार्ड अवाच्या सव्वा दराने पात्र नसलेल्या रुग्णांसाठी वापरून मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोळ झालेला आहे 1655 बोगस रुग्णांची नावे लिहून ४.५ कोटीची रक्कम क्लेम करण्यात आली असल्याचेही समोर आले आहे ,अशी माहिती अखिल भारतीय ग्राहक पंचायतने एका पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्हाधिकाऱ्यामार्फत पाठविलेली आहे.

विदर्भातील सर्व जिल्ह्यातून एकाच दिवशी माननीय पंतप्रधानांना हे निवेदन पाठविण्यात आले. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या नागपूर जिल्हाध्यक्ष गणेश शिरोळे महानगर अध्यक्ष दत्तात्रय कठाळे महानगर संघटन मंत्री संजय धर्माधिकारी जिल्हा सचिव प्रकाश भुजाडे, भुजाडेल, महानगर सचिव विलास ठोसर यांचा समावेश असणाऱ्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी श्रीमती आर विमला यांना. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेले निवेदन सोपविले. इतर जिल्ह्यातही त्या त्या भागातील अध्यक्ष संघटन मंत्री आणि अप्रतिनिधींनी तेथील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिली.

मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या निवेदनाद्वारे आयुष्यमान या जगातील सर्वात मोठ्या आरोग्य योजनेमध्ये झालेल्या घोटाळ्यांची संगतवार माहिती देण्यात आली. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने आरटीआय मार्फत मिळवलेल्या माहितीप्रमाणे, निदेशक, आयुष्यमान भारत योजना मध्य प्रदेश यांना निवेदन देऊन कार्यवाहीची मागणी केली, आरटीआय कडून आलेल्या तपास अहवालात 47 इस्पितळांची पाहणी करण्यात आली त्यापैकी 18 इस्पितळांमध्ये गडबडी झाल्याचे स्पष्ट झाले पाच इस्पितळांची आयुष्यमान मान्यता रद्द करण्यात आली.

तेरा इस्पितळावर दंड ठोकण्यात आला यायाशिवाय आता पुन्हा 90 पेक्षा अधिक इस्पितळांबर चौकशी सुरू असल्याचे नाटक सुरू करण्यात आले आहे. मध्य प्रदेश आहेत जी आयुष्यमान योजनेच्या भरोशावर सुरू झाली आणि त्यातले फंडिंग देखील आयुष्यमान मधून मिळणाऱ्या मदतीने होत आहे ज्या रुग्णांना गरज आहे त्यांना कुठेही थारा नाही. आयुष्यमान आरोग्य योजनेची विशेष शोध पथक/ सीबीआय च्या माध्यमातून चौकशी व्हावी, रुग्णांना त्यांचे बिल उपचारासाठी आवश्यक आजार त्यावर उपचार आणि उपाय याची स्पष्ट माहिती उपलब्ध व्हावी. आयुष्यमान सारख्या जागतिक स्तरावर कौतुक झालेल्या योजनेत झालेला व्यापक दुरुपयोग आणि भ्रष्टाचारात लिप्त असलेल्या व्यवस्थापनाविरोधात अधिकाऱ्याने विरोधात कारवाईचे धोरण स्वीकारण्यात यावे. आयुष्यमान योजना चालविणाऱ्या सर्व इस्पितळांची ऑडिट तपासणी व्हावी आणि त्यांना नियमित ऑडिट ठेवण्याचे निर्देश देण्यात यावे
आयुष्यमानच्या तक्रारींसाठी विशेष केंद्रीय पोर्टल सुरू करण्यात यावे आणि त्यावर तक्रारींची सत्य माहिती त्यावर झालेले कारवाई याची स्पष्ट माहिती देण्यात यावी असे एकूण 11 मागण्या ग्राहक पंचायतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles