शिक्षक समितीचा हिरक महोत्सवी स्थापना दिवस कन्नड येथे उत्साहात साजरा

शिक्षक समितीचा हिरक महोत्सवी स्थापना दिवस कन्नड येथे उत्साहात साजरा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

औरंगाबाद: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा हिरक महोत्सवी स्थापना दिवस आज दि २२ जुलै रोजी जि.प.केंद्रीय प्राथ.शाळा कन्नड नं.1 येथे उत्साहात साजरा करण्यात आला.

”अन्यायाची चीड आणि न्यायाची चाड” ” त्याग आणि सेवा..” या ब्रीद वाक्यासह बालके, शिक्षण व शिक्षकांचा कैवार घेत ” गेल्या ६० वर्षांपासून शिक्षकांच्या संघटनात्मक चळवळीत सदैव संघर्षरत व अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या ‘हिरक महोत्सवी वर्धापनदिनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शै.साहित्य, शुध्दलेखन वही, चित्रकला वही, दोन, चार रेघी वह्या, उजळणी पुस्तक, पेन, पेन्सिल आदी शैक्षणिक साहित्याचे व मिठाईचे वाटप करण्यात आले.

सर्व प्रथम शिक्षक समितीचे संस्थापक कै.भाव गुरुजींच्या प्रतिमेस हारगुच्छ अर्पण करून अभिवादन करण्यात आले.उपस्थितांना औरंगाबाद जिल्हा शिक्षक समितीचे जिल्हा प्रसिध्दीप्रमुख सतीश कोळी यांनी शिक्षक समितीच्या आजपर्यंतच्या वाटचलीची माहिती देण्यात आली. याप्रसंगी शिक्षक समितीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.राजू ठाकूर सर,मा.अध्यक्ष एन.एस.चव्हाण सर,श्री.नाना चव्हाण सर संचालक शिक्षक पतसंस्था कन्नड, तथा फांऊंडर मेंबर्स शिक्षक समिती),श्री.सुभाष भोळे सर(कन्नड),श्री.अमोल देशमुख सर,बोरसे सर,श्री.नंदू शिंदे सर,अर्चना पाटील मँडम, सुवर्णा गायके,(कन्नड नं.3) नाजेरा अन्सारी, सबा अन्सारी (कन्नड नं.1) कल्याण राऊत आदी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles