
सचिन दादा पाटील फाउंडेशन कडून डोळे तपासणी शिबीर
_राधानगरी तालुक्यातील कासारवाडा येथील उपक्रम_
सुभाष चौगले, कुडूत्री(प्रतिनिधी)
राधानगरी: येथील युवा नेते सचिन दादा पाटील यांच्या मार्फत कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदार संघातील लोकांच्यासाठी अल्प दरात शिबिर व चष्मे वाटप कार्यक्रम काळमादेवी मंदिरात मोफत डोळे तपासणी शिबीर घेण्यात आले.तपासणी शिबीराचा शुभारंभ सरपंच बाबुराव जाधव उपसरपंच संतोष जितकर तंटामुक्ती अध्यक्ष सुनील वारके दूध साखर कारखाना चे संचालक युवराज दादा वारके व सचिन दादा पाटील यांचे हस्ते करण्यात आला.
शिबिरामध्ये २४० लोकांची डोळे तपासणी करण्यात आली व त्यातील २२३ नागरिकांना सचिन दादांच्या माध्यमातून अवघ्या साठ रुपयात त्याच दिवशी चष्मे वाटप करण्यात आले. व कॅम्पला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस दोन साबण भेट देण्यात आले असे आरोग्य विषयी उपक्रम मतदारसंघात लावण्याचा सचिन दादांचा उद्देश आहे या शिबिरासाठी डॉ.शीतल शिरसाट,श्री.गणेश चिकणे, श्री.गोपाळ पानभरे ,श्री.प्रशांत भुसारी, उत्तम पताडे अतुल स्वरूप निलेश पाटील यश वारके व इतर गावातील मंडळे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमास यश वारके यांचे विशेष सहकार्य लाभले