आयुर्विमा कर्मचा-यांचे विदर्भस्तरीय वार्षिक संमेलन थाटात

आयुर्विमा कर्मचा-यांचे विदर्भस्तरीय वार्षिक संमेलन थाटात



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_भांडवलशाही व्यवस्था बदलविण्यासाठी ‘ट्रेड यूनियन’ हेच प्रभावी शस्त्र : हितेंद्र भट_

नागपूर : जागतिकीकरणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती अतिशय भयावह झाली असून केंद्र सरकार सन २०२५ पर्यंत आपली अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॅालरची बनविण्याचे नवभारताचे स्वप्न दाखवून जनतेच्या डोळ्यात निव्वळ धुळफेक करीत आहे. भारत सरकारच्या भांडवलधार्जिण्या व कामगारविरोधी धोरणांमुळे कष्टकरीवर्ग नेस्तनाबूत होत आहे. परिणामत: गरीब -श्रीमंता मधील दरी प्रचंड रुंदावली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावणारे सार्वजनिक उद्योग कवडीमोल भावाने भांडवलदारांच्या हवाली करण्याचा प्रयत्न राज्यकर्ते करीत आहे.

या पार्श्वभूमीवर देशातील बहुसंख्य जनतेचे जीवनमान सुधारावे, विषमता कमी व्हावी व शोषणमुक्त समाज निर्माण व्हावा यासाठी भांडवलशाही व्यवस्था बदलविणे हिच आजची खरी गरज आहे. व ती बदलविण्यासाठी ट्रेड यूनियन हेच प्रभावी व धारदार शस्त्र असल्याचे मत हितेन्द्र भट यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.
भारतीय आयुर्विमा महामंडळा तील प्रमुख संघटना नागपूर विभागीय आयुर्विमा कर्मचारी युनियनचे ६१ वे विदर्भस्तरिय वार्षिक संमेलन एलआयसी मुख्यालयातील सभाग्रूहात आज असंख्य विमा कर्मचा-याच्या उपस्थितीत यशस्वीपणे संपन्न पार पडले.

या संमेलनाचे उद्घाटन पश्चिम क्षेत्रीय विमा कर्मचारी असोसिएशनचे सरचिटणीस हितेंद्र भट यांच्या शुभ हस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ विमा कामगार नेते रमेश पाटणे, अ.भा.विमा पेंशनर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष टि.के.चक्रवर्ती, विदर्भ विमा पेंशनर्स असोसिएशनचे सरचिटणीस पी.व्ही. मिलींदकुमार तर अध्यक्षपदी अनिल ढोकपांडे व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी संघटनेचे विभागीय सरचिटणीस वाय. आर.राव यांनी संघटनेचा वार्षिक अहवाल सभाग्रुहासमोर सादर केला.

या अहवालावर विदर्भातून आलेल्या शाखा सचिवांनी आपआपल्या भाषणातून चर्चा करीत शासन-प्रशासनाच्या कामगारविरोधी धोरणांवर जोरदार टिका केली. १ ऑगस्ट २०२२ पासून देय सुधारित वेतनश्रेणीचा मसुदा प्रशासनाला सादर करणे, खासगी करणाविरोधात लढा तीव्र करणे, एलआयसीला मजबूत करणे, फॅमिली पेंशनमध्ये सुधारणा करणे, नोकरभरती त्वरित सुरू करणे, लेबर कोड बील रद्द करणे, स्वातंत्र्याचा अम्रूत महोत्सव साजरा करणे, वाढती महागाई, बेरोजगारी व भ्रष्टाचाराला आळा घालणे, संघटनेला मान्यता आणि प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करणे इ. ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.

आपल्या अध्यक्षीय भाषणातून अनिल ढोकपांडे म्हणाले की, एलआयसी -आयपीओ हा केंद्र सरकारची केवळ वित्तीय तूट भरून काढण्याचा प्रयत्न नसून श्रमिकांच्या बचतीतून निर्माण झालेली संपत्ती भांडवलदारांच्या घशात घालण्याच्या आर्थिक धोरणांचा भाग आहे. हि वस्तुस्थिती लोकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. विमाधारकांची गुंतवणूक एलआयसीत सध्या सुरक्षित आहे. भविष्यात देखील ती सुरक्षित रहावी याकरिता एलआयसीला अधिकाधिक मजबूत करण्याची गरज आहे. याकरिता सर्व सभासदांनी मोठ्या संघर्षाकरिता सज्ज रहावे असे आवाहन त्यांनी विमा कर्मचा-यांना केले.

याप्रसंगी संघटनेची नविन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी शिवा निमजे, सरचिटणीसपदी वाय.आर.राव व कोषाध्यक्ष म्हणून राजेश विश्वकर्मा यांची एकमताने निवड करण्यात आली. याप्रसंगी सेवानिवृत्त सभासदांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तु देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन वाय.आर. राव यांनी तर नरेश अडचुले यांनी आभार मानले. यशस्वीतेकरिता सर्वश्री जी हरी सरमा, अभय पाटणे, हिना जीभकाटे, राजेश खंडेलवाल, अभय पांडे, मनोहर पवनीकर, संदिप लातूरकर, विवेक जोशी, अशोक चांडक, नरेंद्र उमाळे, शोभा मोहपेकर, सलिल मुळे, मिलींद पवनीकर, बंठी गजबे, शशी सोनूरकर, रवी खापरे, नलिनी धनविजय यासर्वांनी सहकार्य केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles