शासकीय आदिवासी आश्रम शाळा कवडस येथे सिकलसेल तपासणी शिबीर

शासकीय आदिवासी आश्रम शाळा कवडस येथे सिकलसेल तपासणी शिबीर



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

प्रमोद गाडगे, प्रतिनिधी

हिंगणा – आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे , आदिवासी विकास विभाग , महाराष्ट्र शासन यांचे द्वारा महाराष्ट्रातील आदिवासी विभागा अंतर्गत येणाऱ्या सर्व आश्रमशाळा व वसतिगृहे यामधील सर्व विद्यार्थ्यांचे सिकलसेल ॲनिमियाच्या स्थितीचे सर्वेक्षण करणे आणि आदिवासी विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी करून कार्ड वाटप करण्याबाबतची योजना संदर्भात आज आकार बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था नागपूर द्वारा शासकीय आदिवासी आश्रम शाळा कवडस येथे सिकलसेल तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.

शिबिरात एकुण 192 मुला मुलींची सिकलसेल सोलुबिलीटी तपासणी केली यामध्ये 18 विद्यार्थी सिकलसेल सोलुबिलीटी पॉझिटिव्ह आढळल्या. या शिबिरात मुख्याध्यापिका कु.व्ही.बि.खापर्डे व शिक्षक उपस्थित होते. या शिबिरात सिकलसेल कोऑर्डीनेटर विशाल बांदरे यांनी सिकलसेल आजाराबाबत मार्गदर्शन केले.

शासनाच्या या योजनेद्वारा नागपूर व नाशिक विभागाअंतर्गत सुमारे पावणे दोन लाख विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येणार असून सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे रोगनीदान झाल्यावर कार्ड वाटप करण्यात येतील . शिबिर यशस्वीकरीता सिकलसेल कोऑर्डीनेटर विशाल बांदरे, निकीता मेश्राम,सुषमा आत्राम यांनी सहकार्य केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles