महाराष्ट्रात चाललंय काय? ‘बाबासाहेबांची गाणी लावली म्हणून सरपंचाने केली दलित कुटुंबाला मारहाण’

महाराष्ट्रात चाललंय काय? ‘बाबासाहेबांची गाणी लावली म्हणून सरपंचाने केली दलित कुटुंबाला मारहाण’



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सुबोध चहांदे

यवतमाळ: डीजेवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी लावली म्हणून यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यातील कारला इथ एका दलित कुटुंबाला गावच्या सरपंचासह नातेवाईकांनी बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. अखेरीस याा प्रकरणी तक्रार केल्यानंतर पुसद ग्रामीण पोलिसांनी 9 जनाविरुद्ध गुन्हा दाखल केला केला. आपल्यावर गावकऱ्यांनी बहिष्कार टाकल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी मात्र बहिष्काराचा आरोप फेटाळून लावला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारला येथील अनुसायाबाई प्रकाश टाळीकुटे यांच्या मुलीचा विवाह 25 जुलै रोजी आयोजित केला होता. त्या निमित्याने 24 जुलै ला हळदीचा कार्यक्रम सुरू होता. दरम्यान डीजेवर महापुरुषाचे गाणे सुरू होते. हे गाणे का लावले म्हणून गावाचे सरपंच रमेश राठोड त्या ठिकाणी आले आणि त्यांनी गाणे बंद करण्यास सांगितले. यावरून सरपंच आणि टाळीकुटे कुटुंबात वाद झाला.

त्यानंतर सरपंच यांनी आपल्या काही साथीदारांना घटना स्थळी बोलावले, टाळीकुटे कुटुंबातील महिला आणि पुरुष सदस्यांना बेदम मारहाण केली. त्यामुळे काही जणांना पाठीवर जखमा ही झाल्या. तर महिलेला सुद्धा जबर मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली, अशी तक्रार आशाबाई टाळीकुटे यांनी पोलिसांत दिली आहे.

पुसद ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तत्काळ कार्ला येथे धाव घेतली. रमेश राठोड, प्रमोद रमेश राठोड, गोविंद रमेश राठोड, अमोल रमेश राठोड, दयाराम सुधाकर चव्हाण, वाघू सुधाकर चव्हाण , सदानंद शिवा राठोड, देऊ राठोड व राजू राठोड यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीसह विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहे. याप्रकरणाची चौकशी दारव्हाचे उपविभागीय अधिकारी आदित्य मिरखेलकर करीत आहेत. सध्या गावात शांतता आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. याप्रकरणी शिलानंद कांबळे व इतर सामाजिक संघटनांनी पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांना निवेदन देऊन आरोपींविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली आहे. आरोपींचा शोध सुरू असून लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles