महाराष्ट्र राज्य किसान सभा, नागपूरतर्फे तहसिलदारांना ठिकठिकाणी निवदने

महाराष्ट्र राज्य किसान सभा, नागपूरतर्फे तहसिलदारांना ठिकठिकाणी निवदने



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर

नागपूर :- दि. १ ऑगस्ट २२ रोजी
किसान सभे तर्फे उमरेड, रामटेक, कुही, पारशिवनी, बुटीबोरी, सावनेर तहसील समोर, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतजमीन धारकांना ५० हजार रूपये हेक्टर भरपाई च्या मागणीला घेऊन निदर्शने तसेच बुटीबोरी मध्ये आयटकचे कार्यकर्ते अन्नधान्य व शैक्षणिक साहित्य वर लावण्यात आलेली जीएसटी कर मागे घ्या मागणीला घेऊन सामिल. महाराष्ट्र राज्य किसान सभे तर्फे तहसीलदार कार्यालया समोर निदर्शने व मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

बुटीबोरी येथे किसान सभेचे जिल्हा सचिव कॉ. अरूण वनकर, आयटक आ॑गणवाडी कर्मचाऱ्यांच्या नेत्या कॉ. ज्योती अ॑डरसहारे यांच्या नेतृत्वात पोलीस ठाण्या समोरून आशा कर्मचारी, आ॑गणवाडी सेविका, शेतकरी- जबरान जोतधारक या॑चा मोठा मोर्चा निघुन बुटीबोरीत मार्गक्रमण करीत, ‘मोदी हटाव, देश बचाव’ च्या घोषणा देत बुटीबोरी च्या पुलाखालील चौकात जोरदार नारे बाजी करण्यात आली. कॉ. अरूण वनकर व कॉ. ज्योती अ॑डरसहारे यानी ८० मिनिटे स॑बोधित केले.२०० च्या वर कार्यकर्ते सामिल झाले होते. बुटीबोरी चे पोलीस निरीक्षक श्री. पाटील यांना मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन सादर केले. अरुण वनकर, ज्योती अ॑डरसहारे, प्रिती राहुलकर, र॑गलाल परतेती, दुर्योधन मसराम, या॑चा शिष्ठम॑डळात समावेश होता. निदर्शकात दुधा, मा॑गली, कवठा, मोहगाव, तारसी, बोरखेडी गावातील शेतकरी सामिल झाले होते.

कुही तहसील कार्यालयासमोर किसान सभेचे जिल्हा, सहसचिव कॉ. ग॑गाराम खेडकर, राजु वाडीभस्मे यांच्या नेतृत्वात निदर्शने, तहसीलदार मा. का॑बळे यांनी निवेदन स्विकारले. उमरेड तालुक्यात किसान सभेचे जिल्हा सहसचिव कॉ. अमर ढेपे, विजय चौधरी यांच्या नेतृत्वात निदर्शने व तहसीलदारा॑ना निवेदन देण्यात आले. पारशिवनी तालुक्यात जिल्हा उपाध्यक्ष कॉ. जमील शेख, उपसरपंच गुणेश्वर भलावी यांच्या नेतृत्वात निदर्शने व तहसीलदारा॑ना निवेदन देण्यात आले. सावनेर तालुक्यात कॉ. सुधाकर वाघुके, कॉ. ऋषी सहारे, याच्या नेतृत्वात निदर्शने व तहसीलदारा॑ना निवेदन देण्यात आले.

रामटेक तहसिल समोर किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष ऍड. आनंद गजभिये, उपाध्यक्ष श॑कर कुमरे, सहसचिव कॉ. राधेश्याम मेश्राम यांच्या नेतृत्वात जोरदार निदर्शने झाली. कॉ. श’कर कुमरे, आनंद गजभिये यांनी स॑बोधित केले. १०० च्या वर कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्यमंत्री च्या नावे निवेदनात १.अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरयाऺना सा॑गली-कोल्हापूर फार्मुला नुसार ५० हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर करा. २. नियोजन फेल झाल्यामुळे महाजनको, ओपन कोल माइन्स, जलसिंचन विभाची चौकशी करीता न्यायिक आयोगाचे गठन करा.
३. अन्नधान्य व शालेय सामग्री यावर लावण्यात आलेली जीएसटी कर मागे घ्या.
४. वनहक्क प्रलंबित वैयक्तिक वनहक्क दावे व पूर्ण विचार याचिका निकाली काढा.
५. वनपट्टे प्राप्त झालेल्या शेतकरयाऺना पिककर्ज, व शासकीय मदत देण्यात यावी. आदी मागण्याचा समावेश आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles