शिक्षकांच्या आयकर कपात तसेच चट्टोपाध्याय वेतन श्रेणीतील त्रुटी त्वरीत दूर करा

शिक्षकांच्या आयकर कपात तसेच चट्टोपाध्याय वेतन श्रेणीतील त्रुटी त्वरीत दूर करा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_प्राथमिक शिक्षक संघातर्फे गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन_

समुद्रपूर: प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद वर्धा यांना प्राथमिक शिक्षक संघ समुद्रपूर तर्फे यांना दि २४ जून रोजी एका पत्राद्वारे 30 जून 2022 ला सेवेची 12 वर्ष पूर्ण होत असलेल्या शिक्षकांचे चटोपाध्याय प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिलेले आहे. परंतु आजस्थितीला पं.स.समुद्रपूरने याबाबत कार्यवाही केलेली नाही. तसेच पं.स. समुद्रपूर अंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या आयकर कपातीच्या चुकीच्या कार्यवाहीमुळे शिक्षकांना आर्थिक दंड पडत आहे. असंख्य शिक्षकांची वेतनातून कपात केलेली आयकर रक्कम 26A5 मध्ये दिसत नाही. काहींचे उत्पन्न वाढविलेले आहे. त्यामुळे अधिकचा ‘आयकर 26 As वर दिसत आहे. अशा बऱ्याच बाबी अनियमित असल्याच्या कारणावरून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी या मागणीचे आज दि १ ऑगस्ट रोजी गटशिक्षणाधिकारी भास्कर साखरकर यांना निवेदन देण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की, चटोपाध्याय वेतन श्रेणीसाठी पात्र होत असलेल्या तसेच याअगोदर ज्यांना मिळाली नाही अशाही शिक्षकांकडून आवश्यक माहिती/कागदपत्रे मागविली होती. परंतु याबाबतचा चटोपाध्य वेतनश्रेणी प्रस्ताव जि.प. कार्यालयाकडे सादर करण्यात दिरंगाई दिसून आल्याचे शिक्षक संघाचे विभाग प्रमुख अजय गावंडे यांनी सांगितले. आयकर रिटर्न भरण्यासाठी शासनाने 31 जुलै मुदत दिलेली होती. परंतु या अगोदर short payme यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती. यादीनुसार सबंधित शिक्षकांनी कर रक्कम भरण्याची कार्यवाही केली. प 26AS वर सदर भरलेली रक्कम दिसत नाही. तसेच बहुसंख्य शिक्षकांची आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये एकूण प्राप्त उत्पन्नापेक्षा (फॉर्म नंबर 16 मध्ये दर्शविलेले) अतिरिक्त उत्पन्न 26AS वर दिसत असल्याचेही गटशिक्षणाधिकारी साखरकर यांच्या निदर्शनास आणून दिले.

आयकर रिटर्न भरण्याची मुदत 31 जुलै होती. 01 ऑगस्टपासून 30 सप्टेंबर पर्यंत रु.5000/- दंड आकारणी मुदत आयकर विभागाने सुरु केली. 24 क्यू च्या अपूर्ण व अनियमित कार्यालयीन कार्यवाहीमुळे दंडास कार्यालय जबाबबदार आहे असे शिक्षकांचे ठाम मत आहे. ज्या शिक्षणांना आयकर पडत नाही अशांची सुद्धा 24क्यू कार्यवाही अपूर्ण आहे. त्यांनाही 31 जुले पश्चात रिटर्न भरतांना 1000/- दंड आकारणी आयकर विभागाने केलेली आहे. एकंदरीत समुद्रपूर कार्यालयाच्या बेजबाबदार कार्यपद्धतीने शिक्षकांना मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत गटशिक्षणिधिकारी यांनी गंभीरतेने लक्ष देऊन योग्य कार्यवाही करावी. या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले आहे.

दरम्यान, यासंदर्भात शिक्षकांच्या समस्या ऐकून घेतल्यावर गटशिक्षणाधिकारी समुद्रपूर यांनी आपल्या सर्व मागण्यांची दखल घेत कार्यवाहीतील त्रुटी दूर करण्याचे आश्वासन दिले असून संबंधित लिपीक तसेच कर्मचारी यांना शिक्षकांच्या आयकर कपातीतीत त्रुटी दूर करण्याचे निर्देश दिले आहे. त्यांनी पुढे सांगितले की, ज्या शिक्षकांच्या कपातीबाबत आर्थिक वर्ष 2019-20, 2020-21 आणि 2021-22 मधिल काही अडचणी प्रलंबित असेल तर त्यांनी लेखी स्वरूपात माहिती कनिष्ठ लिपीक धाईत, गट साधन केंद्र, समुद्रपूर यांचेकडे दि. 5 ऑगस्ट 2022 पर्यंत पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींचा विचार करण्यात येणार नाही असेही सांगितले.

याप्रसंगी प्राथमिक शिक्षक संघ तालुका समुद्रपूर शिष्टमंडळात अजय गावंडे (विभाग प्रमुख) , प्रेम भोजनकर (ता. अध्यक्ष), वसंत कापटे (जिल्हा उपाध्यक्ष) राहुल पाटील (ता. सचिव) विशाल केदार (कोषाध्यक्ष), क्रिष्णा तिमासे, भुरे पाटील, बाबाराव पावडे, महल्ले सर, कांबळे सर, प्रकाश नगरारे आदी शिक्षक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles