शिक्षकांना मिळणार शिक्षकदिनी वरिष्ठ व निवड श्रेणीचा लाभ

शिक्षकांना मिळणार शिक्षकदिनी वरिष्ठ व निवड श्रेणीचा लाभ



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या निवेदनावर माध्य. शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचे आश्वासन_

गजानन ढाकुलकर

नागपूर :- शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक (माध्यमिक) आणि शिक्षण संचालक (प्राथमिक) यांना वरिष्ठ व निवडश्रेणीचे प्रस्ताव निकाली काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात शिबीर लावावे, असे निवेदन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटने तर्फे निवेदन देण्यात आले होते.त्याबद्दल पाठपुरावा म्हणून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन ची समस्त पदाधिकारी टीम श्री. शिवराम घोती सर ( राज्याध्यक्ष) यांच्या नेतृत्वात शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक नागपूर यांची भेट घेतली.

नागपूर शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक श्री, रविंद्रजी काटोलकर यांनी वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीचे प्रस्ताव निकाली काढण्याबाबत शिबिर सप्टेंबर १ते ३ दरम्यान लावली जाईल असे आश्वासन दिले, व ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून त्याच दिवशी शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी लावल्या जाईल असे आश्वासन दिले तसेच महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटन सोबत शिक्षकांच्या इतर मागण्या संदर्भात एक सभा आयोजित करणार असे आश्वासन दिले.

सभेला उपस्थित सर्व पदाधिकारी यांनी साहेबांचे आभार मानले, त्याप्रसंगी उपस्थित शिवराम घोती (राज्याध्यक्ष) महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन, गजानन टांगले (राज्य कोषाध्यक्ष), यशवंत कातरे (नागपूर विभागीय अध्यक्ष),प्रवीण भोगे (विभागीय उपाध्यक्ष, केशवानंद बमनोटे (विभागीय कोषाध्यक्ष), स्वप्नील गवई (विभागीय संघटक), कोहिनुर वाघमारे (नागपूर जिल्हा अध्यक्ष), महेश गिरी (नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष), देविदास येलूरे (जिल्हा कोषाध्यक्ष) उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles