
एस एस एम विद्यालयात शैक्षणिक साहित्य वितरणासह वृक्षारोपण
वर्धा: प्रोग्रेसिव एजुकेशन सोसायटी हिंगणघाट द्वारा संचालित एस. एस. एम.विद्यालय, हिंगणघाट येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून विद्यालयातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश शैक्षणिक साहित्य वितरण व वृक्षारोपण कार्यक्रम साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव मा. श्री. र.गं.धारकर प्रमुख अतिथी मा.श्री. केदार सर मा. श्री.परागजी कोचर तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री.च. ज्ञा. खडतकर उपमुख्याध्यापिक सौ. हिंगमीरे पर्यवेक्षिका सौ.मद्दलवर प्रामुख्याने उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वती लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते शालेय परिसरात राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषणे व गीते व पोवाडे सादर करून उपस्थिताना मंत्रमुग्ध केले. मुख्याध्यापक श्री खडतकर यांनी लोकमान्य व अण्णाभाऊ साठे यांनी केलेल्या सामाजिक कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
तसेच केदार परिवार यांचे कडून मागील अनेक वर्षापासून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वितरण व मद्दलवार परिवाराकडून शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येत असून त्यांच्या या सहकार्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले यावेळी प्रमुख अतिथी श्री केदार सर यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी परिश्रम करण्याची तयारी ठेवावी शालेय जीवनात शिस्त ही फार महत्वाची असते असे मत व्यक्त केले.
श्री परागजी कोचर यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री धरकर सर यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात थोर पुरुषांचे योगदान फार महत्त्वाचे आहे त्यांचे विचार आत्मसात करून राष्ट्रभक्त नागरिक निर्माण करणे हे शाळेचे कर्तव्य आहे तसेच दानशूर व्यक्तीनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी धन्यवाद व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन श्री.बुलदेव यांनी तर आभार प्रदर्शन शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ.हिंगमिरे यांनी केले कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम ने करण्यात आली. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.