
नगरसेवक दादारावजी ईटनकर महावितरणच्या भोंगळ कारभारावर बरसले
गजानन ढाकुलकर
हिंगणा :- पंचवटी पार्क हिंगणा मधील रहिवाशी व नगर पंचायत हिंगणा येथील नगरसेवक दादारावजी ईटनकर यांच्याच वार्डात येत असलेल्या महावीतरण कनिष्ठ अभियंता शाखा हिंगणा ग्रामीण २ कार्यालयात विद्युत वितरण अधिकारी कर्मचारी यांचेकडे पुरवठा बंद असल्या बाबत तक्रार नोंद केली.कर्मचारी यांनी थाथुर माथूर पुरवठा सुरू केला जो काही काळाने पुन्हा खंडित झाला त्या वेळेस भगत नामक कर्मचारी यांना मोबाईल वरून संपर्क केला तर त्यांच्या कडून योग्य प्रतिसाद दिल्या जात नाही.
छोटे मोठे लाईन बंद झाल्याचे काम केले तर कर्मचारी पैशाची मागणी करतात नाही दिले तर योग्य काम न करता चाल चलावू काम करून मोकळे होतात. वार्डात महावितरण कार्यालय असताना एवढा त्रास होत असेल तर बाकी भागात किती त्रास होत असेल असा संतप्त सवाल त्यांनी केला.व सरळ महावितरण कार्यालयातच धडक देताच कार्यालयातील अधिकारी यांनी कानाला फोन लावून पोबारा केला .
नवरसेवक दादारावजी ईटनकर आपल्या सहकारी यांच्या सोबत जवळ जवळ एक तास बसून राहले पण कोणीही तेथे फिरकले नाही या वरून असे निदर्शनात येतात की ज्या जिल्ह्यात नुकतेच दोन ऊर्जा मंत्री होऊन गेले असताना हिंगणा महावितरण कार्यालयाचा भोंगळ कारभार सूदरु शकले नाही तर ऊर्जा मंत्रालयाचा कारभार नागपुरातील आमदार यांना देणे व्यर्थपणा सारखे वाटत आहे असेही ते म्हणाले.
याप्रसंगी अशोकराव घुमळे , बाबाराव मेहर , बाळकृष्ण चिखलकुंदे , देवाजी सुरेल , विकास दिवेदी , गौरी त्रिपाठी मॅडम , गंगाधर पवार , मेघा बांदरे , नागोसेताई , गोडबोलेताई , बालकृष्ण मुंडे आदि नागरिक उपस्थित होते.