नप वाडी येथील कंत्राटी साफ सफाई कामगारांचे आर्थिक पिळवणूक बंद कधी होणार?

नप वाडी येथील कंत्राटी साफ सफाई कामगारांचे आर्थिक पिळवणूक बंद कधी होणार?



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_मा मुख्यधिकारी यांना मनसे वाडीतर्फे आंदोलनाचा इशारा_

वाडी: अनेक वर्षांपासून नगर परिषद वाडी येथिल कंत्राटी साफ सफाई कामगार यांना कामगार किमान वेतन मिळत नाही.ही वाडीतील संपुर्ण नेत्यासाठी समाजसेवका साठी व नप वाडी येथील मुख्यधिकाऱ्या साठी खेदजणक घटना आहे त्या कंत्राटी सफाई कामगारांचां विषय का मार्गी लागत नाही . वारंवार तक्रार करूनही त्यांना शासकिय सुविधाचा लाभ का मिळत नाही.

आज नवीन टेंडर ची वर्क ऑर्डर देऊन दोन महिने होत आहे परंतु नवीन साफ सफाई कंत्राटी ठेकेदारानी किमान वेतन 26 दिवसाचा पगार 16160 रुपये का दिले नाही 10000 हजार रुपये 30 दिवसाचा पगार देतआहे त्या नियमानुसार 24 %पीएफ खात्यात जमा केला पाहिजे होता पण तसे दिसत नाही त्यांना pf uan no मिळाला पाहिजे होता esic दवाखाना कार्ड मिळाला पाहिजे होते दोन महिने होऊन सुद्धा साफ सफाई कामगार शासकिय योजनां पासून वंचित आहे.

मनसे वाडी सफाई कामगाराच्या पाठीशी खंबीर पने उभी आहे आणि समोर राहू . ठेकेदाराणी त्यांच्या हक्व अधिकारावर दगा आणण्याचा प्रयत्न करून नये . पुढच्या महिन्यात ऑगस्ट 2022 चे वेतन 16160 कामगारांना किमान वेतन मिळाले नाही शासकिय नियमानुसार pf,व esic कार्ड दिले नाही तर मनसे वाडी रस्तावर उतरून आंदोलन केल्या जाईल याची दखल प्रशासनाने घ्यावी अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी नप वाडी प्रशासन जबाबदार राहतील.

मनसेचे प्रदेश सरचिटणीस मा हेमंत भाऊ गडकरी, जिल्हा अध्यक्ष सतीश भाऊ कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व , तालुका संघटक दीपक ठाकरे मनसे तालुका अध्यक्ष अनिल पारखी यांच्या नेतृत्वात उपस्थित मनसे शहर उपाध्यक्ष वैभव तुपकर, मुकेश मुंडले, अजिंक्य वाघमारे, सूरज भलावी,बबलू सिंग, विठोबा घुरडे, ओंकार तलमले अश्विन कोडापे,नितीन पिठोरे,,संदीप माने, संतोष पाल, आकाश बाबर अतुल मिश्रा मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles