
डाॕ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद निवडणुकीच्या मैदानात उतरणार : शांताराम जळतेंची घोषणा
सतीश भालेराव नागपूर
नागपूर : आॕगस्ट महिण्यात नागपूर विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा होणार असल्यामुळे सर्वच शिक्षक संघटना त्यादृष्टीने कामाला लागल्याचे निदर्शनास येत आहे. यावर्षी नागपूर विभागातील प्रत्येक जिल्ह्यातील तालुका पातळीवर पोहचलेल्या डाॕ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेने या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला असुन संजय निंबाळकर हे त्यांचे उमेदवार राहणार असल्याची घोषणा संघटनेचे राज्य-उपाध्यक्ष शांताराम जळते यांनी केली.
डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे नागपूर विभागीय अध्यक्ष संजय निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमीत्त आयोजित शिक्षक बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव परमेश्वर राऊत, शेख अयाज, वैनगंगा शिक्षणसंस्थेचे सचिव विनोद मेंढे, फीनिक्स पब्लिक स्कूल संचालक विठ्ठल ठाकरे, मराठा-सेवा-संघाचे शहराध्यक्ष प्रमोद वैद्य, काँग्रेस शिक्षक सेलचे अध्यक्ष संजय धरममाळी, जिल्हा अध्यक्ष मेघराज गावखरे, गुणवंत डेवाडे व संजय आदी उपस्थित होते.