
राजाराम सिताराम दीक्षीत वाचनालय येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन
नागपूर: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राजाराम सीताराम दीक्षित वाचनालय सीताबर्डी येथे चित्रकला स्पर्धा आणि सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राजाराम सिताराम दीक्षित वाचनालय सीताबर्डी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चित्रकला आणि सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून सर्व ग्रामीण आणि शहरी शाळेतील शिक्षकांनी वाचनालयाच्या वेळेस सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ४:३० ते ८ वाजेपर्यंत वाचनालयाच्या ग्रंथपाल यांना भेटावे.