स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी ९ रोजी धरणे आंदोलन

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी ९ रोजी धरणे आंदोलन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन_

नागपूर: स्वतंत्र राज्य विदर्भ राज्याचे रणशिंग फुंकण्यासाठी नागपुर येथे दिनांक ९ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी एक वाजता भव्य लॉग मार्च व धरणे आंदोलन होणार आहे. हा लॉग मार्च गांधी पुतळा व्हेरायटी चौक येथून निघून संविधान चौक नागपुर येथे आल्यानंतर धरणे आंदोलन होणार आहे. या आंदोलनाला विदर्भातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन वेगळ्या विदर्भाचा आवाज बुलंद करावा, असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीने केले आहे. विदर्भाचा सर्वागीण विकास, नक्षलवादाला आळा, प्रदूषण व कुपोषण संपविणे आणि बेरोजगार, शेतकरी, व्यापारी, महिला, तरुण या सर्वाना विदर्भातील त्यांच्या हक्काचा न्यायवाटा मिळावा आणि विदर्भा वरील अन्याय दूर व्हावा, यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती हाच एकमेव पर्याय असून विदर्भ राज्य आंदोलन समितीने विदर्भ राज्य निर्मिती मिशन २०२३ अंतर्गत या आंदोलनाचे आयोजन केले आहे.

समितीच्या प्रमुख मागण्या केंद्र सरकारने विदर्भाचे स्वतंत्र राज्य तात्काळ निर्माण करावे, विजेची दरवाढ राज्य सरकारने तात्काळ मागे घ्यावी, अन्नधान्यावरील जी.एस.टी. तात्काळ रद्द करावी, पूर, अतिवृष्टी व ढग फुटीमुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याने हेक्टरी ७५ हजार रुपये तात्काळ मदत जाहीर करावी, या प्रमुख मागण्या या आंदोलना द्वारे करण्यात येणार आहे. ११७ वर्ष जुन्या असलेल्या या स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला अनेक पक्षांनी पाठिंबा दिला. मात्र वेळ येताच या राजकीय पक्षांनी घुमजाव केले. हे राज्य आर्थिक दृष्ट्या प्रगत आणि सक्षम होईल, असा सर्वसमित्या, कमिशन, आयोग यांचा अहवाल आहे.

विदर्भ सर्वच दृष्टीने सक्षम असतानाही विदर्भाला, येथील लोकांना अद्याप न्याय मिळाला नाही. सिंचन, उद्योग, शिक्षण, रस्ते, वीज, सार्वजनिक आरोग्य, ग्रामविकास, शेती, शासकीय सेवा नोकरी, विकासकामे, लाभाच्या योजना या सर्वच बाबतीत मोठा अनुशेष बाकी आहे. विदर्भावर अपरिमित अन्याय झाल्याचे हा अनुशेषच सांगतो. परिणामी शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, नक्षलवाद, कुपोषण, बालमृत्यू, नोकरीसाठी स्थलांतर अशा अनेक ज्वलंत समस्या विदर्भापुढे उभ्या आहेत आणि कोणत्याही राजकीय पक्षांकडे या प्रश्नाचे उत्तर नाही. म्हणुन याचे आता एकच उत्तर, एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे विदर्भाचे स्वतंत्र राज्य.

यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती सातत्याने विविध आंदोलने करून विदर्भातील जनतेची ही मागणी सातत्याने लावून धरत आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, यासाठी नागपुर येथे क्रांतीदिनी दिनांक ९ ऑगस्ट ला व्हेरायटी चौकातील गांधी पुतळ्या पासून संविधान चौकापर्यत लॉग मार्च व धरणे आंदोलनाचे आंदोलन घोषीत केले आहे.

या आंदोलनात विदर्भवादी कार्यकर्ते, नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्वतंत्र विदर्भासाठी आपला आवाज बुलंद करावा, असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते माजी आमदार अॅड. वामनराव चटप, संपादक प्रकाश पोहरे, महिला आघाडी अध्यक्ष रंजना मामर्डे, अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष मुकेश मासुरकर, अरुणभाऊ केदार, कोर कमेटी सदस्य अॅड. मोरेश्वर टेमुर्डे, प्रबिरकुमार चक्रवर्ती, धनंजय धार्मिक, धर्मराज रेवतकर, रेखा निमजे, सुनीता येरणे, विष्णूजी आष्टीकर, डॉ.जी.एस. खाजा, प्रभाकर कोंडबत्तूनवार, सुयोग निदलावार, तात्यासाहेब मत्ते, गोपाल यादव, अशोक पाटील, अनिल तिडके, प्रदीप उबाळे, मीतीन भागवत, कपिल ईद्दे यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles