भिवापुरात महालगाव येथे निपुण भारत प्रशिक्षणाचे आयोजन

भिवापुरात महालगाव येथे निपुण भारत प्रशिक्षणाचे आयोजन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

भिवापूर: निपुण भारत अभियानां अतर्गत तालुक्यातील केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा महालगाव येथे शिक्षक व अंगणवाडी सेविका शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे संयोजक परसरामजी पिल्लेवान सर (केंद्र. प्र.महालगाव) यांनी केले होते, तर या परिषदेचे अध्यक्ष म्हणून मान.श्री.राजुजी वांगे (अध्यक्ष. शा.व्य.स.महालगाव)प्रमुख पाहुणे म्हणून श्री.रुपेंद्र आंबुलकर सर(मु.अ.भिवी टेकडी),श्री.मनोहर बेले सर (मु.अ.उरकुडापार),श्री.देवरावजी डेकाटे सर(सालेभट्टी दंदे) तसेच श्रीमान.मंगेश जी कोकाटे(शिक्षण प्रेमी सदस्य महालगाव) आदी उपस्थित होते.

या सर्व पाहुण्यांनी शिक्षणाची जनक , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमाला सर्व मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत करुन प्रास्ताविक मान.श्री.परसरामजी पिल्लेवान सरांनी (केंद्र प्र.महालगाव) निपुन भारत अभियांनाचे महत्त्व पटवून दिले, तरया कार्यक्रमाचे अध्यक्ष राजू वांगे (शा.व्य.स.अध्यक्ष)यांनी निपुन भारत अभियान ही एक विद्यार्थ्यांना नवसंजीवनी आहे.ती अंगणवाडी सेविका व शिक्षक यांनी प्रभावीपणे राबवून आदर्श विद्यार्थी घडवावेत अशा शुभेच्छा देऊन परिषदेचे उद्घाटन झाले.

या कार्यक्रमाला गटसाधन केंद्र भिवापुर येथील साधनव्यक्ती श्रीमान मिलिंद जी मेश्राम सर तसेच श्रीमती मेघा गुरुनुले साधनव्यक्ती यांनी सदिच्छा भेट देऊन मार्गदर्शन केले. यात गटकार्य देण्यात आलेले होते ते कार्य गटप्रमुखांनी सादरीकरण उत्तमप्रकारे केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अनिल वंजारी सर यांनी निपुन भारत अभियानाची प्रतिज्ञा देऊन आभार मानले. सर्वच शिक्षक अंगणवाडी सेविका १००% उपस्थित होते. अशाप्रकारे शिक्षण परिषद संपन्न झाली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles