२२ शाळा, महाविद्यालयीन आठ हजार विद्यार्थ्यांनी गायले सामूहिक राष्ट्रगीत

२२ शाळा, महाविद्यालयीन आठ हजार विद्यार्थ्यांनी गायले सामूहिक राष्ट्रगीत



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षांनिमित्त विशेष उपक्रम_

परभणी/सेलू, प्रतिनिधी

परभणी: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षां निमित्त उपविभागीय अधिकारी कार्यालय व नगर परिषद, गटशिक्षणाधिकारी सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामुहिक राष्ट्रगीत कार्यक्रमात वेगवेगळ्या २२ शाळेतील एकुण आठ हजार विद्यार्थ्यांनी व नागरी यांनी सामुहिक राष्ट्रगीत गायन करून स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग फुलवले.

येथील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर मंगळवार दिनांक ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आयोजित सामुहिक राष्ट्रगीत गायन कार्यक्रमाला पावसाची रिमझिम असताना ही परभणी जिल्ह्यातील सेलूकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी अरूणा संगेवार, तहसीलदार दिनेश झांपले, मुख्याधिकारी देविदास जाधव,पोलीस निरीक्षक गाडेवाड साहेब, गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत, शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे, माजी नगराध्यक्ष विनोदराव बोराडे, उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, माजी जि.प.सभापती अशोक काकडे,नूतन संस्था अध्यक्ष डॉ एस.एम.लोया, प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, जयप्रकाशजी बिहाणी,प्रभारी प्राचार्य महेंद्र शिंदे यांची उपस्थिती होती. सच्चिदानंद डाखोरे व गंगाधर कान्हेकर यांच्या संचाने गायलेल्या सारे जहाँसे अच्छा व वंदेमातरम् गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. त्या नंतर ठिक ११ वाजता सामूहिक राष्ट्रगीत गायन झाले.

या कार्यक्रमात नूतन महाविद्यालय, नूतन विद्यालय,नूतन कन्या प्रशाला,न्यू हायस्कूल,शारदा विद्यालय, यशवंत विद्यालय,श्री के. बा. विद्यालय, जिजामाता विद्यालय, ज्ञानतीर्थ विद्यालय, यासेर उर्दू, डॉ. झाकिर हुसेन विद्यालय, विवेकानंद विद्यालय,न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल,प्रिन्स इंग्लिश स्कूल,नूतन इंग्लिश स्कूल, व्हिजन इंग्लिश स्कूल,के.बी. जी.व्ही. शाळा, एकलव्य विद्यालय, खान अब्दुल गफारखान विद्यालय, विद्यानिकेतन,शैलजा उर्दू, या २२ शाळेतील आठ हजार विद्यार्थ्यांसह, सर्व शिक्षकवृंद, प्राध्यापक,शहरातील नागरीक सहभागी झाले होते.

सामूहिक राष्ट्रगीत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहभागी सर्व शाळेचे व नागरीकांनी उत्स्फूर्त सहभाग व सामुहिक राष्ट्रगीताने वातावरण भारावून गेले,विद्यार्थीनी स्वयंस्फूर्तीने तिरंगा वेष परिधान केल्यामुळे देशभक्ती ची जनजागृती दिसून आल्याचे उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार या म्हणाल्या व सर्वाचे आभार मानले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.डी. सोन्नेकर,डॉ.काशीनाथ पल्लेवाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सामुहिक राष्ट्रगीत कार्यक्रम संयोजक गणेश माळवे,प्रा.नागेश कान्हेकर,प्रा.के.के. कदम,सुभाष मोहकरे,सुनील राठोड,आर. बी. पदमपल्ले,गजानन साळवे,विजय चौधरी,के व्ही नाईक,भालचंद्र गांजापुरकर, आश्विन केदासे, किशोर ढोके,चिचोड लतीफ, संजय धारासुरकर,आदी नोडल टिचर,पोलीस अधिकारी व कर्मचारी,महसुल विभाग व न.प.अधिकारी व कर्मचारी वृंदांनी परिश्रम घेतले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles