हिंगणा तालुक्यात पाऊस थांबता थांबेना

हिंगणा तालुक्यात पाऊस थांबता थांबेना



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_शेती जनावरे, घराचे नुकसान झालेल्यांना तात्काळ उज्वला बोढारे यांची शासनाकडे मदतीची मागणी_
हिंगणा :- डिगडोह (पांडे), देवळी (काळबांडे), अडेगाव, देवळी (पेंढरी), सावंगी ( देवळी) या हिंगणा तालुक्यांतील गावात मोठ्या प्रमाणात सतत लागून असलेल्या पाऊसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच पाऊस व पुरामुळे अनेक नागरिकांची घरे जमीनदोस्त झाली आहे. गुरे ढोरे व बकऱ्यांचे नुकसान झाले. अनेकांचे संसार उद्धवस्त झाले असून डिगडोह (पांडे) या गावात साधारण १५० ते २०० लोकांच्या स्वयंपाकाची व्यवस्था ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आली आहे.

तसेच देवळी काळबांडे व देवळी पेंढरी गावातील पुलाचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या दोन्ही गावांत तसेच सावंगी देवळी या गावात पुर संरक्षण भिंत बांधकामा करीता शासनाने तातडीने मदत करावी तसेच सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रूपये नुकसान भरपाई द्यावी आणि संपूर्ण हिंगणा तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली.यावेळी नागपूर जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती सौ. उज्वलाताई बोढारे, यांनी हिंगणा तहसीलदार प्रियदर्शनी बोरकर , हिंगणा खंडविकास अधिकारी बाळासाहेब येवले यांच्या समक्ष केली.

यावेळी हिंगणा पंचायत समितीच्या सभापती सौ.रुपाली खाडे, प्रविण खाडे, दिलीपभाऊ काळबांडे, राजु काळबांडे, रामराव पाटील तिडके, सोनु भाऊ तिडके, युसुफभाई पठाण सरपंच राजू बावणे अडेगाव तहसील व पंचायत समिती ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील व तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते हजर होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles