
‘गाव तिथे शाखा, घर तिथे महाराष्ट्र सैनिक’
नागपूर: मनसे नेत्या राज्य सरचिटणीस, महिला सेनेच्या राज्य उपाध्यक्ष सौ. रिटाताई गुप्ता यांच्या हस्ते प्रभाग 46 रघुजी नगर नागपूर येथील महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी, राज्य सरचिटणीस सुचिता माने, उपाध्यक्ष ऋतुजा परब, शहराध्यक्ष मनीषाताई पापडकर यांच्या नेतृत्वामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष विशाल बडगे, शहराध्यक्ष अजय ढोके, जिल्हाध्यक्ष किशोर सराईकर, विदर्भ प्रभारी आदित्य दुरुदकर, दत्ता साकुळकर, विभाग अध्यक्ष तुषार गिर्रे (दक्षिण पश्चिम) विभाग अध्यक्ष दक्षिण मंजुषा पानबुडे, शहर सचिव अर्चना कडू, विभाग अध्यक्ष नंदा खोब्रागडे (पूर्व) शहर उपाध्यक्ष मनीषा पराड (दक्षिण विधानसभा) शहर उपाध्यक्ष पूनम चाडगे (दक्षिण विधानसभा) शहर उपाध्यक्ष इंदिरा वाघमारे (मध्य विधानसभा) दक्षिण सचिव दीपा चिरकुटे, प्रभाग अध्यक्ष मीनल शितोळे, दक्षिण उपाध्यक्ष अंकित झाडे, चेतन बोरकुटे, मीडिया प्रभारी वैभव पराते , साहिल पापडकर, राज बहिर अनेक महिला व कार्यकर्ते महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.