चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी

चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: माजी ऊर्जा मंत्री तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे हे ओबीसीचा चेहरा म्हणून त्यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. बावनकुळे नागपुरचे असून ते आता भाजपच्या राज्यातील सर्वोच्चपदी विराजमान झाले आहे. तसेच भाजपच्या प्रदेशाध्यक्षांकडे पुढील मुख्यमंत्री म्हणून पाहिलं जातं. कधीकाळी विधानसभा निवडणुकीत तिकीट डावलेल्या बावनकुळे यांनी मोठी झेप घेतली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मंत्रिपद मिळाल्यानं हे पद रिक्त झालं होतं. त्याजागी आता बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात होणार आहे. याची अधिकृत घोषणा भाजपकडून संध्याकाळी करण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबादारी घेण्यासाठी तयार झाले होते. मात्र भाजपचे संघटन बाहेर राहून मजबूत करण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. मात्र पक्ष नेतृत्वाने त्यांना डावललं. तसेच उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्याचे निर्देश दिले. आता संघटनाची जबाबादारी बावनकुळे यांच्याकडे सोपवली आहे.

बावनकुळे यांनी विदर्भात त्यांच्या कामाचा ठसा उमटवला आहे. त्यांना प्रदेश अध्यक्षपदी संधी दिल्याने ओबीसी समाजामध्ये देखील वेगळी भावना निर्माण होणार आहे. त्यातच पुढील काळात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्दावर बावनकुळे अॅक्टीव झाले होते. या व्यतिरिक्त बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांना विधान परिषद मिळाल्याचं बोललं जात होतं.

तसेच बावनकुळे २०१२ ते २०१९ या कालावधीत राज्याचे उर्जामंत्री होते. मंत्रीपदी असताना देखील त्यांना विधान सभा निवडणुकीसाठी तिकीट नाकारण्यात आलं होतं. त्यानंतर देखील बावनकुळे पक्षाशी एकनिष्ट राहिले. त्याचं फळ त्यांना मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles