‘यशस्वी जीवनासाठी मन आणि शरीर निरोगी असणं आवश्यक’; डॉ . विकास बामणे

‘यशस्वी जीवनासाठी मन आणि शरीर निरोगी असणं आवश्यक’; डॉ . विकास बामणे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मुंबई / ठाणे: भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त ‘वर्ल्ड विजन’ मुंबई आणि ‘मधुरंग’ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बामणे’ज क्लिनिक देसले पाडा डोंबिवली या ठिकाणी विनामूल्य वैद्यकीय चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी “यशस्वी जीवनासाठी मन आणि शरीर दोन्हीही निरोगी असणे आवश्यक आहे!” असे प्रतिपादन डॉ.विकास बामणे यांनी केले. ते या शिबीरात उद्घाटक म्हणून बोलत होते.

सदर शिबिरासाठी बामणे डॉक्टर दांपत्य डॉ. विकास बामणे आणि डॉ. प्राची बामणे यांचे अमूल्य सहकार्य लाभले. सदर शिबिराचा परिसरातील बहुसंख्य संख्येने सर्वसामान्य जनतेने लाभ घेतला. या शिबिराच्या आयोजनासाठी वर्ल्ड व्हिजन मुंबईचे संस्थापक अध्यक्ष प्रा. नागेश हुलवळे आणि मधुरंग पुणे अध्यक्ष, संस्थापक डॉ. मधुसूदन घाणेकर यांनी डॉ . विकास बामणे आणि डॉ. प्राची बामणे यांचे हार्दिक आभार मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles