‘वैष्णवाचा धर्म’ लेखक प्रा. ढोले या ग्रंथाचे प्रकाशन

‘वैष्णवाचा धर्म’ लेखक प्रा. ढोले या ग्रंथाचे प्रकाशन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: येथील श्री संत गजानन महाराज भक्तिकुंज आश्रमामध्ये ‘श्रीनिवास प्रकाशन संस्था, देवळी, जि.वर्धा या संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी या संस्थेचा प्रथम ग्रंथ ‘वैष्णवाचा धर्म’ (लेखक प्रा. ढोले) चे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक व संशोधक डॉ. म.रा.जोशी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

प्रकाशनपूर्वी श्री संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण उद्घाटक डॉ. म.रा.जोशी, अध्यक्ष डॉ. गोपाल बेले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ. म.रा. जोशी म्हणाले – “वारकरी संप्रदाय हा वैश्विक भावना ठेवणारा असून तो कोणताही भेदभाव बाळगत नाही. सर्वांचा सर्वांसाठी असणारा हा संप्रदाय आहे. या संप्रदायाचा कळस म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराज त्यांचा प्रत्येक अभंगच एक ग्रंथ आहे. प्रा.ढोले यांनी ‘वैष्णवाचा धर्म’ ग्रंथ रूपाने प्रत्ययास आणून दिले.

‘श्रीनिवास प्रकाशन’चे प्रमुख प्राचार्य डॉ. गणेश मालधुरे प्रास्ताविक करतांना म्हणाले- समाजात प्रा. ढोले यांच्यासारखे अनेक नामांकित लेखक आहेत. परंतु त्यांना प्रकाशक मिळत नाही. अशांना संधी उपलब्ध करून देणे तसेच वाचकांना वाजवी मूल्यात ग्रंथ उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक मानस आहे. आमच्या प्रकाशनाद्वारे पारमार्थिक विचार देणारा ग्रंथ ‘वैष्णवाचा धर्म’ प्रकाशित करण्याचा बहुमान मिळाला यातच मला आनंद आहे.

‘डॉ. दिनकर येवलेकर म्हणाले, ‘विश्वसंत तुकाराम महाराजांच्या अभंगावर प्रा. ढोले यांनी ‘वैष्णवाचा धर्म’ हे अचूक शीर्षक देवून चिंतनपर ग्रंथाची निर्मिती केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव बेले यांनी आपल्या अध्यक्षीय ‘भाषणात ‘वैष्णवाचा धर्म’ हा ग्रंथ पारमार्थिक व आत्मकल्याणाच्या साधनेकरिता मार्गदर्शक ग्रंथ होय. असा उल्लेख केला. या ग्रंथाचे लेखक प्रा. ढोले आपल्या मनोगतात म्हणाले ‘संत तुकाराम महाराजांच्या ‘वैष्णवाचा धर्म’ या – ग्रंथातून द्वेष भावना नष्ट होते, यातून समाजाला समतेचा संदेश दिला आहे. सूत्र संचालन व आभार प्रदर्शन आश्रमाचे सचिव डॉ. दिनकर येवलेकर यांनी केले. या कार्यक्रमाचे वेळी उपाध्यक्ष डॉ. महल्ले, संस्थापक सदस्य श्री गजानन आसकर, श्री सुधीर टेटे व अनेक मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles