
बीएसपीचा महापौर बनविण्याकरता कार्यकर्ता मेळावा 1 सप्टेंबरला.
नागपूर : BSP तर्फे नुकत्याच झालेल्या बैठकीत 22 ऑगष्ट ला बहुजन समाज पार्टीचे रामेश्वरी कार्यालय याठिकाणी दुपारी 2 वाजता दक्षिण पश्चिम विधानसभेच्या सर्व सेक्टर अध्यक्ष कार्यकर्त्याच्या उपस्थितीत 1 सप्टेंबर ला
नागपूर शहरांमध्ये विदर्भ हिंदी साहित्य सभागृहात कार्यकर्ता मेळावा कार्यक्रम बसपा तर्फे आयोजित होणार आहे.
या मीटिंगमध्ये नागपूरमध्ये बीएसपीचा महापौर बनवण्याकरिता मोठ्या प्रमाणात विधानसभे मधून जास्तीत जास्त मोठ्या संख्येने लोक कार्यक्रमात सहभागी व्हावे आणि सेक्टर, बूथ, मजबूत तयार करून नागपूर शहरांमध्ये बहुजन समाज पार्टीची ताकद वाढवण्याकरिता मान्यवरांनी विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांना आव्हानात्मक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे प्रदेश महासचिव व विदर्भ झोनचे प्रभारी नागोराव जयकर महाराष्ट्र प्रदेश सचिव विदर्भ झोनचे पृथ्वीराज शेंडे, नागपूर जिल्हा अध्यक्ष संदीप मेश्राम, नागपूर जिल्हा सचिव डॉ.शितल नाईक, नागपूर जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग या सर्व मान्यवरांचे उपस्थितीतांच्या समोर होणाऱ्या कार्यक्रमाच्या संदर्भात विस्तृत माहिती आणि मार्गदर्शन करून कार्यकर्त्यांनमध्ये उत्साह वर्धक जोश निर्माण केला. याप्रसंगी कार्यक्रमाचे संचालन विधानसभेचे अध्यक्ष ओपुल तामगाडगे यांनी प्रास्ताविक व संचालन केले. या मीटिंगमध्ये विधानसभेमधील सेक्टर अध्यक्ष व विधानसभा कमिटी उपस्थित होते.
उपाध्यक्ष बंडूभाऊ मेश्राम, महासचिव विशाल बनसोड, कोषाध्यक्ष अशोकजी गोंडाणे, नवनियुक्त सचिव राजेश बडेल, नरेंद्र नगरच्या सेक्टर अध्यक्ष सुंदर भलावी, रामबागचे सेक्टर अध्यक्ष पंकज नाखले, 85 प्लॉटचे सेक्टर अध्यक्ष शरद सोनवणे, गोपाल नगरचे सेक्टर अध्यक्ष सारंग वराडे भामटी परसोडीचे सेक्टर अध्यक्ष विशाल गोंडाणे, जयतळाचे माजी सेक्टर अध्यक्ष आदेश रामटेके, युवा कार्यकर्ता दीपक दोईपूडे, विनोद नारनवरे, भीमनगर जोगीनगर सेक्टरचे अध्यक्ष गजानन पाटील, रामबागचे युवा कार्यकर्ता विकी वानखेडे, रामबागचे महासचिव गौतम गौरखेडे, युवा कार्यकर्ता नरेंद्र पाटील, विकास नगरारे, बबलू मेश्राम, टीव्ही वार्ड अध्यक्ष मनोज सिरकिया, बसपाचे वरिष्ठ कार्यकर्ता कमल गजभिये, त्याचप्रमाणे आदिवासी समाजाचे उमेश कुंमरे व इच्छुक उमेदवार नरेंद्र नगर इत्यादी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मीटिंग पार पडली. कार्यक्रमाचे आभार हर्षवर्धन जिभे यांनी सर्वांचे आभार मानले.