डॉ. संगीता बर्वे यांच्या ‘पियूची वही’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार

डॉ. संगीता बर्वे यांच्या ‘पियूची वही’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

पुणे- ( प्रतिनिधी): प्रसिध्द कवयित्री व लेखिका डॉ. संगीता बर्वे यांना बालसाहित्यासाठी यंदाचा ‘साहित्य अकादमी’चा मानाचा पुरस्कार घोषित झाला असून ‘पियुची वही’ या साहित्यकृतीसाठी ही निवड झाल्याचे नुकतेच अकादमीच्या दिल्ली कार्यालयाकडून संगीताताईंना दूरध्वनीद्वारे कळविण्यात आले आहे. यापूर्वी बालसाहित्यासाठी महाराष्ट्र शासनाचा कवीवर्य भा.रा.तांबे आणि साने गुरुजी पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ग.ह.पाटील पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कारांनी संगीता बर्वे यांना गौरविण्यात आले आहे.

बालसाहित्यातील त्यांच्या भरीव योगदानाची दखल घेऊन मारुंजी, पुणे येथे झालेल्या २६व्या अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी २०१५ साली त्यांची सन्मानपूर्वक निवड झाली होती आणि
आता साहित्य अकादमी या प्रतिष्ठीत साहित्य संस्थेनेही त्यांच्या बालसाहित्यातील प्रदीर्घ साहित्यनिर्मितीची दखल घेऊन ‘पियुची वही’साठी यंदाचा मराठी बालसाहित्याचा पुरस्कार घोषित करून त्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. सध्या संगीता बर्वे ‘अमरेंद्र भास्कर बालकुमार साहित्य संस्थे’च्या अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

कविता, गझल, चित्रपटगीते, अनुवाद , बालसाहित्य अशा विविध साहित्यप्रकारांवर स्वतःची नाममुद्रा उमटविणाऱ्या कवयित्री डाॅ. संगीता बर्वे आयुर्वेद शास्त्राच्या पदवीधर आहेत. त्यांचे “मृगतृष्णा” “दिवसाच्या वाटेवरुन” , “अंतरीच्या गर्भी” हे कवितासंग्रह प्रसिध्द आहेत. कवयित्री इंदिरा संत उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार, नाशिकचा कुसूमाग्रज प्रतिष्ठानचा ‘विशाखा’ पुरस्कार , कामगार साहित्य परिषदेचा ग.दि.माडगूळकर पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांच्या कवितासंग्रहांना प्राप्त झालेले आहेत.

नुकताच गाजलेला ‘धर्मवीर’ हा चित्रपट तसेच
‘कंडिशन्स अप्लाय’, ‘इश्कवाला लव्ह’, आणि ‘मुंबई पुणे मुंबई’ अशा मराठी चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले आहे. साहित्य अकादमी सारखा प्रतिष्ठीत पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संगीताताई यांच्याशी संवाद साधला असता, प्रतिक्रिया देताना त्यांनी “अतिशय आनंद झाल्याचे” सांगितले असून “इतकी वर्ष सातत्याने बाल साहित्य लिहीले, त्याची दखल घेतली गेली;” याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

_संगीता बर्वे यांचे बालसाहित्य_

गंमत झाली भारी,उजेडाचा गाव,रानफुले
झाड आजोबा, खारूताई आणि सावलीबाई
मिनूचे मनोगत,भोपळ्याची बी – चित्रकथा
नलदमयंती आणि इतर कथा ‘पियूची वही’
अदितीची साहसी सफर (अनुवादित)
कचऱ्याचा राक्षस आणि ग्रिनी
झिपरू – कादंबरी (प्रकाशनाच्या वाटेवर)
बोबडगाणी – बाळगाणी (प्रकाशनाच्या वाटेवर)
व्ही.सी.डी.-गंमत झाली भारी,या रे या सारे गाऊ या
बच्चों की फुलवारी (हिंदी)
याशिवाय. पाठ्यपुस्तकातील कवितांचा रसास्वाद
इ. ५वी ते १०वी – ६ पुस्तकांचा संच

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles