
महागाई विरुद्ध ‘आप’चे नारे, आंदोलन
_केंद्र सरकारला आपने धरले धारेवर_
गजानन ढाकुलकर
नागपूर : भाजी पाल्यापासून अनेक जीवनावश्यक वस्तुंवर जीएसटी सारखा राक्षसी कर लावून गरिबांचे जीवन असहाय करुन टाकल्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टी उत्तर नागपूरच्या वतीने कपिल नगर चौक येथे प्रचंड नारे निदर्शने करण्यात आले.
याप्रसंगी केंद्र शासनाच्या ग़रीब विरोधी धोरणाचे पितळ उघड़े पाडण्यात आले. आज दुपारी उत्तर नागपूर आपचे अध्यक्ष रोशन डोंगरे, सचिव डॉ. अमेय इ नारनवरे , संगठनमंत्री प्रदीप पौंनिकर, कोषाध्यक्ष नरेश महाजन यांच्या नेतृत्वात नारे निर्देशनात उत्तर नागपुरातील सर्वसामान्य जनता आणि कार्यक़र्ते मोठाया प्रमाणात सहभागी झाले होते.
“हाय महँगाई हाय हाय महँगाई -ये कहाँ से आयी -मोदी ने लाई’ अशा अभिनव नार्याने कार्यकर्त्ता यांनी परिसर दनातून सोडला. मोदी सरकार नको त्या कार्यासाठी हज़ारो कोटी रुपये ख़र्च करते आणि तो पैसा ग़रीब कामगार अथवा हातावर आणुन पानावर खानाऱ्या लोकांकडून कराच्या रूपाने वसूल करणे अशी टिकाही आपच्या या नेतृत्वाने या प्रसंगी केली.
पेट्रोल , डिझेल यांचे भाव आकाशाला भिडले आहेत, स्वयंपाकाचा सिलेंडर हज़राच्या पार गेला आहे . “कच्ची सब्जी कच्चा भात , खाओ मोदीजी हमारे साथ “ असे नारे देत शासनाच्या मोफत धान्य धोरनावरही या प्रसंगी नारे निदर्शानातून टीका करण्यत आली . मोदी सरकारच्या गरीबांना शिक्षना पासून, नोकऱ्यां पासून वंचित ठेवाण्याच्या धोरणावरही या नारे निदर्शानाद्वारे कडाडून टीका करण्यात आली .
या नारे निदर्शनात भाग घेणाऱ्यात श्री.शंकर इंगोले,प्रदिप पौनिकर, डॉ.अमेय नारनवरे, नरेश महाजन, सुनील मैथु, विजय नंदनवार,अमित दुरानी,परीस भहोतकर,माणशिंग अहिरवार,अब्दुल सलाम,मोरेश्वर मौंदेकर,विशाल लांजेवार, विजय राठोड, पंजाब राठोड, सौ निलम नारनवरे ,लता मॅडमे, अंजु मरतवाडे, योगिता जनबंधु,सतीश सोमकुंवर, पंकज मेश्राम, विशाल वैद्य, स्वप्नील सोमकुंवर, शुभम मोरे, सचिन कांबळे, संकेत चरडे,गीता मेश्राम, उषा नागेश्वर, करुणा बांबोले जयश्री बडगे, रंजना पाटील, नरेश देशमुख,नानक धनवाणी , शैलेश गजभिये, संजय चांदेकर,हिमांशू तांबे,मनोज वरघड, गोलू आंबडे, नंदू नागरारे,साम्ये रामटेके, बबलू गवळी,वरून ठाकूर,अरुण गुणारकर,रविकांत चौरसिया, तुषार गेडाम अनिल संभे, क्लीमेंट डेव्हिड,रवींद्र गिधोंडे,अविनाश सोरते, पवन मोरे, रवींद्र गोखले, पप्पू दुधगवली, स्वाती तारवानी,सचिन चरोटे,नामदेव गेडाम,मॅहोन मेश्राम यांचा सहभाग लाभला.