युवा महोत्सवाचे आयोजन करण्यास जे.एस. एम. महाविद्यालय सज्ज

युवा महोत्सवाचे आयोजन करण्यास
जे.एस. एम. महाविद्यालय सज्ज



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_उद्घाटनासाठी प्रसिद्ध सिने अभिनेत्री प्रार्थना बेहेरे राहणार उपस्थित_

रायगड (अलिबाग): महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना भव्य व्यासपीठ प्राप्त व्हावे म्हणून मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास कक्षातर्फे दरवर्षी जिल्हा व विद्यापीठ स्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. शुक्रवार, दिनांक २६ ऑगस्ट २०२२ रोजी युवा महोत्सवाच्या जिल्हास्तरीय फेरीचे आयोजन जे.एस.एम. महाविद्यालय अलिबाग येथे होणार आहे.

या स्पर्धांचे उद्घाटन प्रसिद्ध सिने अभिनेत्री प्रार्थना बेहेरे व सुप्रसिद्ध सिने दिग्दर्शक अभिषेक जावकर यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून अलिबाग नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत मधुसूदन नाईक हे उपस्थित राहणार आहेत. तसेच मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास कक्षाचे संचालक डॉ. सुनील पाटील व सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक श्री.निलेश सावे यांची सन्माननीय उपस्थिती यावेळी राहणार आहे.

जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. ॲड. गौतम पाटील हे उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील. २६ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ठीक ९.०० वाजता स्पर्धांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. युवा महोत्सवाचे हे ५५ वे वर्ष आहे. या महोत्सवात जे.एस.एम. महाविद्यालयाचे विद्यार्थीही सलग चौथ्यांदा विजेतेपद राखण्यासाठी उत्सुक आहेत. या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करण्यात येत आहे. महाविद्यालयीन स्तरावर प्राथमिक निवड फेऱ्यांतून संघाची निवड करण्यात आली असून विद्यार्थी खूप उत्साहात सराव करत आहेत.

तसेच विविध स्पर्धामध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील व
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील विशेष प्रोत्साहन देत आहेत. रायगड जिल्हा सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.जयेश म्हात्रे व प्राध्यापक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.

अलिबाग , पेण , महाड, माणगाव ,रोहा ,मुरुड ,तळा ,श्रीवर्धन, म्हसळा, सुधागड या तालुक्यातील विविध महाविद्यालयातील सुमारे पाचशे ते सहाशे विद्यार्थी या दिवशी संगीत, नाट्य, नृत्य, वक्तृत्व, वादविवाद, कथाकथन, मेहंदी, मूर्तीकला, कोलाज, कार्टूनिंग, रांगोळी अशा एकूण ३२ स्पर्धांमध्ये सहभाग घेतील. विविध स्पर्धांसाठी एकूण २६ महाविद्यालयांनी आपला सहभाग नोंदवला आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हे एक भव्य व्यासपीठ आहे.

महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील यांच्या नेतृत्वाखाली व प्राचार्य डॉ.अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक प्रा.जयेश म्हात्रे व इतर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उत्साहात तयारी करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles