प्रेरणा कॉलेजचा या वर्षी प्रवेश फी न वाढविण्याचा निर्णय

प्रेरणा कॉलेजचा या वर्षी प्रवेश फी न वाढविण्याचा निर्णय



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: रातुम नागपूर विद्यापीठाने त्यांच्या अखत्यारीतील महाविद्यालयांना एक परिपत्रक पाठवून महाविद्यालयांना २०२२-२३ या शैक्षणिक सत्रात 20% आणि दरवर्षी 07% शुल्क वाढविण्यास सांगितले आहे! ज्या विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी आधीच प्रवेश घेतला आहे त्यांच्याकडून 20% अतिरिक्त शुल्क वसूल करावे आणि येत्या काही दिवसांत प्रवेश घेणार्‍या सर्व विद्यार्थ्यांसाठी सध्याच्या शुल्क रचनेत ही रक्कम जोडावी, असेही विद्यापीठाच्या परिपत्रकाने महाविद्यालय प्रशासनाला सांगितले आहे.

शहरातील रेशम बाग परिसरात असलेल्या प्रेरणा कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये वाणिज्य, विज्ञान आणि कला शाखेचे एकूण 16 पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवीले जातात. येथे दरवर्षी सुमारे 5000 विद्यार्थी शिक्षण घेतात. खरे तर 20% फी वाढवुन कायमस्वरूपी विना अनुदान तत्वावर चालणारे महाविद्यालय लाखो रुपये कमवू शकते. परंतु प्रेरणा महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांवर 20 टक्के अधिक शुल्काचा आर्थिक भार न टाकण्याचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना फार मोठा दिलासा दिला आहे ! वाढत्या महागाई मुळे गोरगरिबांचे जीवन अगोदरच दयनीय झाले असतांना फी वाढ केल्यास गरिब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे अतीशय कठीण होईल ह्या विचारानेच महाविद्यालयाने हा आर्थिक दृष्ट्या धाडसी निर्णय घेतला.

प्रेरणा महाविद्यालय हे वाजवी शुल्क आकारून उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देण्यास कटिबद्ध आहे जेणेकरून समाजातील सर्व स्तरांच्या विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणे सहज शक्य होईल. कोविड 19 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी पालक गमावले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा कॉलेज फीमध्ये भरघोस सवलत देत आहे हे देखील सर्वज्ञात आहे. कॉलेजच्या या उपक्रमाचे पालक संघटनेकडून कौतुक होत आहे.

महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रवीण जोशी यांनी सर्व संबंधित विद्यार्थ्यांना आश्वासन दिले आहे की, महाविद्यालय कोणत्याही परिस्थितीत या वर्षीच्या फी रचनेत बदल करणार नाही! गरीब विद्यार्थ्यांच्या व्यापक हितासाठी अशा प्रकारची समाजोपयोगी भूमिका घेतल्याबद्दल विद्यार्थी संघटनांनी प्रेरणा सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रोफे. आर सी गुल्हाने आणि सचीव डाॅ.एस सी गुल्हाने यांचे आभार मानले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles