
मनसे तर्फे सहकारनगरात भव्य दहीहंडी आज
नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दक्षिण पश्चिम विभागातर्फे गुरुवारी स्थानिक सहकारनगर मैदान, गजानन मंदिरा जवळ सायंकाळ 5 वाजता. भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या उपस्थितीत आठवडाभर प्रमुख आयोजक विभाग अध्यक्ष तुषार गिऱ्हे, शहर अध्यक्ष अजय ढोके, चेतन बोरकुटे, शिरीष पटवर्धन, चेतन शिरालकर, व सर्व पदाधिकारी कसून तयारी करीत आहे. या उत्सवरुपी स्पर्धेत विविध ठिकाणच्या चमूना आमंत्रित करण्यात आले आहे. या दहीहंडी उत्सवाला सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहतील. रोख रक्कम 75 हजार रुपये प्रथम बक्षीस दिले जाणार आहे असे आयोजकांनी कळविले आहे. या कार्यक्रमात जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तुषार गिऱ्हे, यांनी केले आहे.