भारतात लवकरच होणार 6G लाँच

भारतात लवकरच होणार 6G लाँच



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 6G संदर्भात मोठी घोषणा_

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवार, २५ ऑगस्ट रोजी 6G संदर्भात मोठी घोषणा केली आहे. देशात लवकरच 5G सेवा सुरू होणार असून आता 6G सेवाही सुरू होणार असल्याची माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. या दशकाच्या अखेरीस सरकार 6G लाँच करण्याची तयारी करत असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. स्मार्ट इंडिया हॅकाथॉनच्या ग्रँड फिनालेमध्ये नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही घोषणा केली.

गेल्या सात ते आठ वर्षात एकापाठोपाठ एक क्रांती घडवून देश झपाट्याने प्रगती करत असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. “आज भारतात पायाभूत सुविधांची क्रांती झाली आहे. आरोग्य क्षेत्रात क्रांती होत आहे. तसेच डिजिटल क्रांती होत आहे. तंत्रज्ञान क्रांती होत आहे. कृषी क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, संरक्षण क्षेत्राच्या आधुनिकीकरणावर देशाचा भर आहे. कृषी आणि आरोग्य क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी तरुण नवनवीन उपायांवर काम करू शकतात. आपण आपली सिंचन उपकरणे, सिंचन नेटवर्क स्मार्ट कसे बनवू शकतो यातही भरपूर वाव आहे,” असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

देशातील प्रत्येक गावात ऑप्टिकल फायबर टाकण्याचे काम वेगाने सुरू आहे. तसेच भारतात लवकरच 5G लाँच होत आहे. तसेच या दशकाच्या अखेरीस, सरकार 6G लाँच करण्याची तयारी करत असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles