
ग्रेट स्कॉलर पब्लिक स्कूलमध्ये नंदी मेकिंग व महाराष्ट्रीयन पोशाख स्पर्धेचे आयोजन
गजानन ढाकुलकर
हिंगणा :- स्वामी विवेकानंद युथ मल्टीपर्पज सोसायटी द्वारा संचालित व अमर नगर वानाडोंगरी स्थित ग्रेट स्कॉलर पब्लिक स्कूल मध्ये तान्हा बैल पोळ्या निमित्त महाराष्ट्रीयन पोशाख स्पर्धा व नंदी मेकिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली.
या स्पर्धेमध्ये मुलांना महाराष्ट्रीयन पोशाख वापरून यायचा होता म्हणजे मुलींना नवारी व बैल पोळ्याच्या दिवशी शेतकरी कुटुंब महाराष्ट्रा मध्ये जसे सजून व पोशाख घालून बैलजोडीची पूजा करतात त्याचप्रमाणे बळीराजा ची वेशभूषा मुलांना करायची होती व मुलींना बैलाची पूजा करण्या करता जसे महाराष्ट्रीयन महिला आकर्षक दागिने घालून, सजून, आतुरतेने बैल पोळ्याच्या दिवशी बैल जोडीच्या पूजनासाठी बैल जोडीची वाट पाहतात असा महाराष्ट्रीयन पोशाख घालून स्पर्धेत सहभाग घ्यायचा होता या स्पर्धेत जवळपास ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
यात नर्सरी मधून महाराष्ट्रीयन ड्रेस स्पर्धेत प्रथम क्रमांक वंश खोब्रागडे व श्रुती मेश्राम, द्वितीय क्रमांक शिवांश पटले व अनुष्का बालपांडे, तृतीय क्रमांक रेयांश राऊत व धानी आडे यांनी पटकावला तर प्रोत्साहन पर म्हणून खुशाली पाल, निधी शेंडे,आशी जंघेला यांना देण्यात आले. के.जी. वन क्लास मधून प्रथम क्रमांक रियांश धमगाये व समृद्धी मेश्राम, द्वितीय क्रमांक देवांश सूर्यवंशी व पुण्याई ठोंबरे, तृतीय क्रमांक स्वरूप मेश्राम व मिस्टी मिसारे यांनी पटकावला तर प्रोत्साहन पर म्हणून दर्शन यादव व पुनम मलघाटी यांना देण्यात आले.
तसेच के.जी. टू क्लास मधून प्रथम क्रमांक तन्मय लिल्हारे व तानिया कावळे, द्वितीय क्रमांक आदित्य जयस्वाल व सृष्टी अडमे, तृतीय क्रमांक ग्रंथिक विजयवार व स्वरा मरठे यांनी पटकावला तर प्रोत्साहन पर म्हणून शशांक देवांगण, आरुषी टेंबरे, रुद्र वर्मा, आलिया वैद्य यांची निवड करण्यात आली. तसेच नंदी मेकिंग स्पर्धेमध्ये हॅन्डमेड स्वरूपात हाताने नंदी म्हणून आणायचे होते यामध्ये नर्सरी क्लास मधून प्रथम क्रमांक भाविका सोनुले, द्वितीय क्रमांक धानी आळे, तर तृतीय क्रमांक निधी शेंडे यांनी पटकावला. प्रोत्साहन पर म्हणून आशी जंघेला हिची निवड करण्यात आली.
के.जी. वन क्लास मध्ये प्रथम क्रमांक पुण्याई ठोंबरे, द्वितीय क्रमांक त्रिशिका लोवंशी, तामेश यादव, तृतीय क्रमांक आरजु मेश्राम हिने पटकाविला तर प्रोत्साहन पर म्हणून माहीर साहू व अथर्व जंघेला यांची निवड करण्यात आली. व के.जी. टू क्लास मधून प्रथम क्रमांक असिमा महातो, द्वितीय क्रमांक निल सोनटक्के तर तृतीय क्रमांक तेजस वानरे यांनी पटकावला तर प्रोत्साहन पर म्हणून सृष्टी अडमे हिची निवड करण्यात आली. यावेळी शाळेचे संचालक कमलेश खोब्रागडे प्रामुख्याने उपस्थित होते. व संगीता अडमे, निर्मला खोब्रागडे, सरिता कावळे, नीलम जयस्वाल, प्रियंका आडे, पुनम खोब्रागडे, अश्विनी माटे, प्रतीक्षा राऊत, हिना रिहल, आरती चौरे, नेहा बोपचे, अनिता टेंबरे व समस्त शिक्षक वर्ग,पालक वर्ग व नागरिक उपस्थित होते.