
मनसेतर्फे मनीष नगर भागात प्रभाग क्रमांक 52 येथे तान्हा पोळा संपन्न
नागपूर: महाराष्ट्र नवनिर्माण सेना दक्षिण पश्चिम मतदार संघातील प्रभाग क्रमांक 52 मध्ये मनीष नगर येथे विभाग उपाध्यक्ष चेतन शिराळकर यांनी तान्हा पोळ्याचा कार्यक्रम आयोजित केला.
कार्यक्रमात नंदीबैलाची पूजा करून आंब्याच्या पानांचे तोरण तोडून मोठ्या आनंदात पार पडला. मोठ्या संख्येने लहान मुलांनी भाग घेतला व मुलांना चॉकलेट बिस्किट देण्यात आले. मनसे प्रदेश सरचिटणीस मा.हेमंतभाऊ गडकरी शहराध्यक्ष अजय ढोके यांच्या मार्गदर्शनाखाली व मनसे विभाग अध्यक्ष दक्षिण पश्चिम श्री तुषार गिऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.