पिवळी मारबत उत्सव तऱ्हाणे तेली समाजातील परंपरा कायम

पिवळी मारबत उत्सव तऱ्हाणे तेली समाजातील परंपरा कायम



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: तऱ्हाणे तेली समाज पिवळी मारबत नागोबा व देवी देवस्थान कमेटी जागनाथ बुधवारी नागपूर येथून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उत्सवाचे 138 वे वर्ष आहे. शनिवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भाजपा यांच्या हस्ते विकास कुंभारे आमदार मध्यनागपूर व प्रवीण दटके आमदार व तऱ्हाणे तेली समाजाचे नागोबा देवस्थानचे अध्यक्ष प्रकाश गौरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ९ वाजता. मिरवणुकीचा शुभारंभ झाला.

पाचपावली, गोळीबार चौक, नेहरू पुतळा येथे काळी मारबत व पिवळी मारबतचे मिलन होऊन जुना मोटार स्टॅन्ड शहीद चौक, कोतवाली, गांधी पुतला, गांधीगेट, अग्रेसर चौक, गोळीबार चौक, भारत माता चौकातून पिवळी मारबत चौक येथून नाईक तलाव येथे दहन भूमीवर दाहा संस्कार रात्री 8:30 वाजता.करण्यात आले. यावेळी दर्शनासाठी असंख्य नागरिक गण मोठ्या संख्येने रस्त्यावर उपस्थित होते व प्रत्येक चौकात मारबतीवे स्वागत करण्यात आले. प्रत्येक चौकात नागरिकांकडून खासी खोकला, रोगराई, ईडा पिडा घेऊन जागे मारबत असे जल्लोष करण्यात आले.

अग्रसेन चौकात संदलाचे आयोजक गणी खान यांनी प्रकाश गौरकर व देविदास गभणे यांना सन्मानित करण्यात आले. या उत्सवातला यशस्वी करण्यासाठी कमिटीचे अध्यक्ष प्रकाश गौरकर, विजय खोपडे, देविदास गभणे, किशोर गालकर, मनोहर मोटघरे, धर्मेंद्र साठवणे, देवानंद आंबा गडे गजानन शेंडे शुभम गौरकर, नितीन खोपडे, शुभम गाभणे, भूषण खोपडे, प्रवीण समरीत, किशोर खोडे, गणेश, अतुल भुते, महेश भुते, इत्यादी कार्यकर्तेयांनी अथक परिश्रम घेतलेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles