शाहाकार इंजिनियर्स अँड डेव्हलपर्स कडून नागरिकांसह शासनाची फसवणूक

शाहाकार इंजिनियर्स अँड डेव्हलपर्स कडून नागरिकांसह शासनाची फसवणूक
नागपूर: हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी येथील रहिवाशी सतीश भाऊराव शाहाकार हे तात्कालीन वानाडोंगरी ग्रामपंचायतचे माजी सरपंच व सदस्य असून त्यांची पत्नी वर्षा सतीश शाहाकार ह्या हल्ली वानाडोंगरी नगर परिषदच्या नगराध्यक्षा आहेत. यांच्या नावाने आपल्या विभागात यापूर्वी काही तक्रारी दाखल झाल्या असल्याची चर्चा सुरू असून त्यावर काही राजकीय नेत्यांच्या दबावामुळे विशेष काही कारवाई झालेली दिसत नाही. तसेच त्यांनी बेकायदेशीर बनावट दस्तावेज द्वारे जमीन हडपल्यामुळे 420 चा गुन्हाह एम.आय.डी.सी.पोलीस स्टेशन नागपूर ( शहर ) मध्ये दाखल आहेत.



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

स्थानिक गुलाबराव डोंगरे यांच्या पत्नीची प्लॉट विकण्याची इच्छा नसताना सुद्धा तशी त्यांनी एम.आय.डी.सी.पोलीस ला तक्रार दाखल केली असताना सुद्धा पोलीस विभागाने कारवाई न केल्यामुळे अखेर दबावाने प्लॉट वर्षा सतीश शहाकार यांच्या नावाने विक्रीपत्र करून देण्यात आल्याची सुद्धा गावात चर्चा सुरू आहे. २ ) राजू सेवकराम शाहाकार हे प्लॉट न.एन – ६ अवि-राज भवन वेस्ट हायकोर्ट रोड लक्ष्मीनगर नागपूर येथील रहिवाशी असून हे मे . शाहाकार इंजिनियर्स अँड डेव्हलपर्स चे प्राप्त माहिती नुसार पार्टनर असून त्याच बरोबर शहाकार गृह निर्माण सहकारी संस्था मर्या नागपूर चे अध्यक्ष आहेत.

यापूर्वीही त्यांनी गृहनिर्माण सोसायटीच्या माध्यमातून वानाडोंगरी , ईसासनी ( वागधरा ) परिसरात शासकीय परवानगी नसताना कुटुंबातील सदस्यांची व इतर नागरिकांची मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर पणे मालमत्ता खरेदी करून जमिनी हडपल्या व त्यावर भूखंड टाकून विक्री केले आहेत. त्यांचे वडील स्व. सेवकाराम दिनबाजी शाहाकार यांच्यावर सुद्धा 420 चा गुन्हा पोलीस स्टेशन एम.आय.डी.सी. येथे दाखल आहेत.

सतीश भाऊराव शाहाकार यांनी व त्यांच्या नगराध्यक्षा असलेल्या पत्नीने लोकसेवक पदाचा दुरुपयोग करून भ्रष्टाचार केला असेल काय ? या सर्व बाबीची चौकशी आपल्या विभागा अंतर्गत आपल्या कार्याप्रती कर्तृव्यदक्ष अधिकाऱ्या मार्फत चौकशी केल्यास व भ्रष्टाचार उघड करणाऱ्या तक्रारदारास आपल्या विभागा कडून जास्तचा त्रास न दिल्यास फार मोठ्या भ्रष्टाचाराचा भांडा फोड होऊ शकतो. सोबत बेकायदेशीर मालमत्तेच्या कब्जापत्राची प्रत सोबत जोडत आहेत. अशाच प्रकारचे चौकशी मध्ये अनेक बेकायदेशीर मालमत्ता खरेदीचे दस्तावेज पुढे येऊ शकतात. या आशयाची तक्रार संतोष कटरे यांनी मा.पोलीस अधीक्षक भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग , मा.मुख्य आयकर आयुक्त , व मा. अंमलबजावणी संचालनालयाकडे केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles