
अल्फा ओमेगा खिश्चन महासंघ व विजन इंडियातर्फे मुक्ती संदेश ज्योत यात्रेचे आयोजन
नागपूर: अल्फा ओमेगा खिश्चन महासंघ व विजन इंडियाच्या वतीने नागपूर शहरातील सर्व चर्च मधील पादरी यांच्या सहकार्याने मुक्ती संदेश ज्योत यात्रेचे आयोजन दि 31 ऑगस्ट 22 रोजी ऑल सेंट कॅथेड्रल चर्च सदर, नागपूर येथे करण्यात आले आहे.
प्रभू येशू मसीचे बारावे शिष्य संत थोमा ज्यांनी इसवी सन 65 ला भारतात पहिल्यांदा केरळ मध्ये येशू मसीचा शुभ संदेश दिला व त्यांचे निधन भारतातच झाले त्यांची ज्योत केरळ होऊन दिल्लीकडे नागपूर मार्गे जाणार आहे . त्याचप्रमाणे ब्राह्मण धर्मातील पंडित रमाबाई शंभर वर्ष आधी प्रभू येशूचा संदेश भारतीयांना दिला त्यांची देखील स्मृति जोत केडगाव पुणेहून नागपूर येथे येणार आहे. ही ऐतिहासिक ज्योत नागपुरातील संताजी सभागृह येथे आणण्यात आली असून आज दि 30 ऑगस्ट रोजी म्युर मेमोरियल हॉस्पिटलच्या प्रांगणात मशालीचे स्वागत करण्यात आले.
हा कार्यक्रम नागपुरातील विविध भागांमध्ये तसेच केडगाव (पुणे) ते नवी दिल्ली आणि चेन्नई ते नवी दिल्ली या मार्गावरील सर्व प्रमुख शहरांमध्ये आयोजित करण्यात आला आहे. नागपूर नंतर ही ज्योत 1 सप्टेंबर 2022 रोजी नागपूर येथील झिरो माइल येथून दिल्लीकडे निघणार आहे. याप्रसंगी विजय मोहोड, फादर संजय कोटझाडे, सिस्टर मीना कोटझाडे, डॉ. वंदना बेंजामिन, पादरी विल्सन पाटील, पादरी प्रकाश बेंजामिन ब्रदर प्रकाश शेरेकर, पादरी अजित आर्यन व पादरी बडू घुळे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत करिता अल्फा ओमेगा खिश्चन महासंघ व विजन इंडियाने भाविकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन केलेआहे .