ऑफिसमध्ये बायकोची आठवण आल्यास सुट्टी

ऑफिसमध्ये बायकोची आठवण आल्यास सुट्टी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_सुट्टयाचा पगार कापला जाणार नाही_

टोकियो: जपान हे आजही भारतीयांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेला देश असून, पूर्वी भारतीय चित्रपटातील शूटींग ही जपान, टोकीयो येथे करण्यात आली आहे. वर्षभरातील सण, आजारपण आणि प्रेग्नन्सीच्या कालावधीत खास सुट्ट्या असतात हे आपणा सर्वांना माहितीच आहे. पण रोमान्ससाठी सुट्टी कधी ऐकली आहे का? पण जपान सरकारने चक्क रोमान्ससाठी सुट्टी जाहीर केली आहे. 10 दिवसांची सुट्टी घेऊन आता कर्मचाऱ्यांना आपल्या जोडीदारासोबत रोमान्स करता येणार आहे.

जपान सरकारने तरुण जोडप्यांसाठी एक विशेष योजना लागू केली आहे. ज्यामध्ये फक्त रोमान्स करण्यासाठी सुट्टी देण्यात आली आहे. तब्बल 10 दिवसांची ही ‘फर्टिलिटी लिव्ह’ असेल. विशेष म्हणजे या सुट्टीचा पगार कापला जाणार नाही. म्हणजे ही पेड लिव्ह असणार आहे. या सुट्टीचे उद्दिष्ट म्हणजे जपानची लोकसंख्या वाढवणे आहे. जपानची लोकसंख्या घटली आहे. 1950-1971 सालापर्यंत जपान जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या 10 देशांमध्ये होता. आता येथे जन्मदर खूप घटला आहे. 126 दशलक्षपेक्षाही कमी झाली
आहे.

*’या’ सुट्ट्यांचा पगार कापला जाणार नाही*

लोक सुट्टी घेऊन घरी राहून रोमान्स करतील आणि जास्तीत जास्त मुले जन्माला घालतील. देशाच्या लोकसंख्या वाढीत त्यांचे योगदान असणार आहे. म्हणून त्यांच्या या सुट्ट्यांचा पगार कापला जाणार नाही. जपानच्या नॅशनल पर्सेनल अथॉरिटीचे अध्यक्ष युको कावामोटो यांनी सांगितले, काम आणि मुले जन्माला घालणे दोन्ही एकत्र नाही करू शकते, असे सरकारी कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे सरकारने त्यांनी सूट दिली आहे. आता वर्षभरात 10 दिवसांची पेड लिव्ह फक्त मुलं जन्माला घालण्यासाठी दिली जाईल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles