

श्री. संत लल्लूसाई महाराज पालखी सोहळा संपन्न
गजानन ढाकुलकर
हिंगणा :- दरवर्षी प्रमाणे या वर्षी १ सप्टेंबरला श्री लल्लूसाई चॅरिटेबल ट्रस्ट हिंगणाच्या वतीने ऋषीपंचमी निमित्त लल्लूसाई पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सर्व भाविक भक्तांनी पालखी सोहळ्याचं इतकं सुंदर प्रदर्शन केले की पूर्ण हिंगणा नगरी श्री.लल्लूसाईच्या नावाच्या जय जयकाराणे दुमदुमली आणि बाबांच्या नावाचे जय घोष करत पालखी मोठ्या उत्साहाने वार्ड क्रं. ५ मधून निघाली ठिकठिकाणी व्यापारी वर्गाकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
पालखी सोहळ्यात उपस्थित भक्तांमध्ये रायपूर हिंगणा ग्रामपंचायतच्या उपसरपंचा श्रीमती दिपालीताई संदिप कोहाड,सौ.प्रिती कोहाड यांनी सुद्धा बाबांच्या पालखी सोहळ्यात सहभाग घेऊन बाबांच्या दर्शनाचा लाभ घेतला तसेच हिंगणा रायपुर मधील युवा सामाजिक कार्यकर्ता श्री.धर्मेंद्र कोहाड व त्यांचे सर्व मित्र परिवार यांच्या सर्वांच्या वतीने अनेक ठिकाणी प्रसाद वितरण करण्यात आले.
या पालखी सोहळ्याचं आकर्षण सचिनभाऊ चानपुरकर , चंद्रकांत पराते, महेश चांदेकर, हेमंतजी धार्मिक,हर्षद नंदनवार,निकेशजी धार्मिक, राहूल सोनकुसरे, शुभम धार्मिक, आरिफभाई शेख,प्रकाश धार्मिक, चंदू मानकर , दिवाकर दुरबुरडे, संजयभाऊ खडतकर, लक्ष्मण दुरबुडे, निखिल खंगार या सर्वांनी सहभाग घेऊन शेवटी इसासनी इथे सोहळा संपन्न झाला.