मुघल साम्राज्यात चलनात होते गणपतीचे ‘नाणे’

मुघल साम्राज्यात चलनात होते गणपतीचे ‘नाणे’



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_नाण्यांवर फारसी भाषेत विघ्नहर्त्याचा उल्लेख_

नागपूर/ चंद्रपूर: कोरोनाच्या दोन वर्षानंतर यंदा संपूर्ण महाराष्ट्रात निर्बंधमुक्त गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. सार्वजनिक गणपती उत्सवाला प्रारंभ होऊन अनेक तप लोटले असले तरी मुघल साम्राज्याच्या काळात चक्क गणपतीचे नाणे काढण्यात आले होते. विशेष म्हणजे या नाण्यावर देवनागरी आणि फारसी भाषेचा अजोड संगम असून त्यात विघ्नहर्त्याचे नाव कोरण्यात आले. 18 व्या शतकात सांगली जिल्ह्यातील मिरज संस्थानात हे नाणे तयार करण्यात आले असून हे दुर्मिळ नाणे सध्या चंद्रपुरातील इतिहास संशोधक अशोकसिंग ठाकूर यांच्या संग्रहालयात जमा झाले आहे.

मुघल साम्राज्याखाली राज्य करणारे मराठा शासनाच्या मिरजचे संस्थानिक चिंतामणराव पटवर्धन यांच्याद्वारे हे नाणे तयार करण्यात आले आहे. 18 व्या शतकात मुघल बादशाह शाह आलम द्वितीय (कार्यकाळ 1759 ते 1806) यांचे साम्राज्य Ganapati Coins in Mughal Empire होते. त्यांच्या अधिपत्यात मराठा शासक मिरज हे संस्थान होते. येथील संस्थानिक चिंतामण पटवर्धन यांच्या घराण्याचे आराध्यदैवत हे गणपती होते. त्यामुळे पटवर्धन यांच्या पुढाकारातुन या नाण्याची टाकसाळ तयार करण्यात आली.

*नाण्याचे वैशिष्ट्य*

या नाण्यावर देवनागरी आणि फारसी या दोन्ही भाषेचा वापर करण्यात आला आहे. देवनागरी लिपीत गणपती तर फारसी भाषेत शाह आलम बादशाह गाझी आणि हिजरी वर्ष 1202 अंकित केले आहे. नाण्याच्या पृष्ठभागी देवनागरी लिपीत पंतप्रधान तर फारसी भाषेत मैमनत मानुस आणि टाकसाळेचे नाव मुर्तुजाबाद (मिरज) अंकित आहे. या चांदीच्या नाण्याचे वजन 11.34 ग्राम आहे. पंतप्रधान हे पेशव्यांच्या काळात पदवी होती. पेशव्यांप्रति निष्ठा व्यक्त करण्यासाठी पटवर्धन यांनी हा मजकूर प्रसिद्ध केला. त्याकाळी कुठल्याही संस्थानिकांचे राजाचे शासन असले तरी नाणी मात्र दिल्लीत विराजमान असलेल्या बादशाहच्या नावावर बनवावे लागत होते. हे नाणे देखील त्यास अपवाद नाही. सध्या चंद्रपुरात ही नाणी बघण्यासाठी भक्तांची चढाओढ लागली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles