🚌लालपरीचा थांबा; सुखद गारवा🚌 हायकू काव्य परीक्षण

🚌लालपरीचा थांबा; सुखद गारवा🚌 हायकू काव्य परीक्षणपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*गावाची वाट*
*खुणावते मनास*
*सुखाची आस*

पोटाचा दाह माणसाला शहराकडे घेऊन जातो..यंत्राच्या गजबजाटात माणूस यंत्रवत काम करतो..पण मनात कुठेतरी गावचं नंदनवन खुणावत असतं.. गौरीनंदनाची गावाकडल्या घरात स्थापना होणार असली की मनाला वेध लागतात ते गावाकडे जाण्याचे..मनाला आनंदाचं उधाण येतं.. आपसूकच पाय गावाकडे जाणाऱ्या लालपरीच्या थांब्याकडे वळतात .. शहरी वाट संपली की मनाला हुरहुर लावणारी गावची वळणवाट सुरु होते.. लालपरीचा गाव वळणावरील थांबा म्हणजे निसर्गाचच छत . या छताखाली भर कडक उन्हातही गावच्या सुख ओढीने मनाला कमालीचा गारवा जाणवतो..

*वळणवाट*
*आत्मसुखाचा थाट*
*हर्षितो श्वास*

🌷खरंच.. जीवनात येणाऱ्या वाटांच्या वळणाचं रूप तरी किती विलक्षण नं ! प्रारब्धाची एक वाट पोटासाठी शहराकडे धाव घेणारी..पण नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही- म्हणूनच की काय, स्वानंदासाठी आत्मसुखासाठी मनाची वाट परत गावाकडेच वळण घेणारी.. या वाटेवरचा प्रवास बाभळीगत असला तरी मनातील मरगळ गावच्या नुसत्या भाव आठवणीने मातीत विरून जाते.. मन कसं आपसूकच शांत व निरामय होते ..या वाटेवर घड्याळ्याच्या काट्याचे गणित नाही, कर्कश आवाज नाही,धावपळ,गोंधळ, गर्दी नाही.. फक्त असते ते मनचैतन्य..हेच मनचैतन्य पाठी गाठोडं घेऊन गावाकडील वळणवाटेवर सुलभ लालपरीच्या प्रतिक्षेत उभं असतं… अगदी तप्ततेतही समाधानानं खळाळत..

✍️हे चैतन्य नेहमीच खळाळतं राहावं , आनंदाच्या अंमळतेचं साहित्यातूनही सुंदर निरुपण व्हावं म्हणून आ . राहुल सरांनी हे सुंदर बोलके चित्र आज लेखनासाठी दिलेलं.. परिक्षणीय रचनेचं अवलोकन करताना.. पाठी गाठोडं घेऊन जगण्यासाठी कुणास गावची वळणवाट आवडली.. तर कुणी लालपरीनेच गावाला जाण्याची जिद्द बाळगली.. तर कुणाला गावच्या माणसांची ओढ साद घालत होती.. तर कुणी उन्हाच्या त्रासाचं वास्तव रेखाटलं.. वर्ण्य विषयाच्या सरस विविधांगतेने आज हायकू काव्यांगण सजला..अशीच काव्यप्रतिभा सुंदर वाटेवर ओघवती वाहू द्या. . सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन 💐💐

✍️थोडसं मनातले ….

क्षण टिपताना.. घटना वा क्षणांचे केवळ वर्णन नको, कलाटणी देताना काहीतरी सूचित करणे आवश्यक.. कारण हायकूतून जे व्यक्त होते ते, त्यापेक्षा अव्यक्ताला जास्त महत्व असते .. म्हणून एकजीव आशयसंपन्न हायकू रचना निर्माण करण्याचा प्रयत्न करुया ..

सर्वांनी दिवाळी अंकात सहभागी होऊन आपले साहित्य प्रकाशित करुया आदरणीय राहुल सरांनी मला परीक्षण लेखणाची संधी दिली मनस्वी आभार

सौ. तारका रूखमोडे
अर्जुनी/मोर, जि. गोंदिया
कवयित्री/ संकलक/ परीक्षक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles