नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गर्भवतीचे हाल

नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गर्भवतीचे हालपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_उपमुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयात गर्भवती महिला बसतात जमिनीवर_

नागपूर: भारत देश स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव साजरा करीत आहे तर एकीकडे आशीया खंडातील क्रमांक दोनचे शासकीय रुग्णालय असलेल्या नागपूर शहरात रुग्णांचे हाल होत असल्याची बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असलेल्या नागपुरातील शासकीय रूग्णालयात गर्भवती महिला अक्षरश: जमिनीवर बसतात. रुग्णांची होणारी हेळसांड ही नवी नसली तरी सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी याकडे पाठ फिरवल्याचे विदारक चित्र आहे.

कोरोना महामारीनंतर सरकारी रुग्णालयं अधिक अद्ययावत करण्याची गरज आहे, अशी भावना सगळ्यांनीच व्यक्त केली. तसे प्रयत्न केले जातील, अशी आश्वासनं दिली गेली. पण खरंच ते झालं का? महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जिल्ह्यांपैकी एक असलेल्या नागपुरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सरकारी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या महिलांची परवड होत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. तासनतास गर्भवतींना उपचारासाठी रांगेत उभं राहावं लागतंय. दुर्दैव म्हणजे या रांगेत उभं राहून थकणाऱ्या महिलांना अक्षरशः जमिनीवर बसण्याशिवाय दुसरा कोणताच पर्यायही नाही. हे धगधगतं वास्तव सरकारी रुग्णालयांच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं आहे. हे दयनीय चित्र केव्हा बदलणार, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

_तासनतास रांग, खुर्चीचा पत्ता नाही_

प्राप्त माहितीनुसार नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील या चित्राने रुग्णालयांच्या दुरावस्थेवर बोट ठेवलंय. गर्भवती महिलांची उपचारासाठी मोठी रांग लागल्याचं दिसून आलंय. या वेळी रांगेतील काही महिला तशाच जमिनीवर बसल्या असल्याने यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सात ते आठ महिन्याच्या गर्भवती महिला उपचारासाठी नोंद करण्यासाठी एक ते दोन तास उभ्या असतात. रांगेमध्ये उभं राहून थकून गेल्यानंतर बसायचं कुठे? असा प्रश्न महिलांना पडतो. पण बसण्यासाठी कोणतीही सोय दवाखान्यात नसल्यानं महिलांना जमिनीवर बसण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नसल्याचं दिसून आलंय.

*कुणी दखल घेणार आहे का?*

मेडिकल प्रशासनाकडून गर्भवती महिलांना बसण्याचीही सोय करण्यात आलेली नाही. पुरेशी यंत्रणा नसल्याने गर्भवती महिलंच्या ओपीडीच्या वेळेस मोठी गर्दी होते. त्यामुळे उपरासाठी सरकारी दवाखान्यात येणाऱ्या गर्भवती महिलांची होणारी परवड कधी थांबणार, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. संतप्त गर्भवती महिलांचा हा प्रश्न सोडवण्यासाठी आरोग्यमंत्री काही दखल घेणार का? उपमुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील शासकीय रुग्णालयातील हे चित्र बदलणार का? असा प्रश्न संतप्त नागरिकांकडून विचारला जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles