मुस्लिम बांधवांच्या घरी गणेशाची स्थापना व नमाज पठण..!

मुस्लिम बांधवांच्या घरी गणेशाची स्थापना व नमाज पठण..!



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_अठरा वर्षीय सिझेल खान मागील दहा वर्षापासून करतोय गणेशाची स्थापना_

ज्ञानेश्वर पवार, नागपूर

नागपूर: देशात जातीच्या नावावर राजकारण करत धर्मा धर्मात तेढ निर्माण करण्याचे वातावरण आपण पाहत आहोतच. मात्र नागपुरातील मुस्लिम समुदायातील बि.बी.ए.प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या अठरा वर्षीय सिझेल खान यांनी मागील दहा वर्षापासून आपल्या घरात गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाची स्थापना करून सलग दहा दिवस विधिवत पूजा अर्चना करत हा सण साजरा करत आहे.

शहरातील दक्षीण नागपूर परिसरातील पार्वतीनगर, रामेश्वरी भागात राहणारा सिझेल हा लहानपणी आपल्या गल्लीतील गणेश उत्सवात सहभागी व्हायचा; तेव्हाच त्याने वडील सोहेल खान यांच्याकडे आपणही आपल्या घरी श्री गणेशाची स्थापना करून पुजा करू असे बोलून दाखवले. वडीलानी क्षणाचाही विचार न करता आपला देश हा सर्व धर्म समभावाचे प्रतिक असून “हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हम सारे भाई भाई,” या ब्रीदवाक्याला अंगीकारत सिझेलने आपल्या घरी एका ठिकाणी गणेशाची आरती व दुसऱ्या बाजुला नमाज पठण हे नित्यनेमाने करू लागला.

दहा दिवस चालणाऱ्या गणेश उत्सवात दररोज आरतीच्या वेळी मोदक, लाडूचे प्रसाद तयार करून श्री गणेशाची आरती, व ” हरे राम हरे हरे” “हरे कृष्ण हरे हरे” अशी मंत्र सिझेलला तोंडपाठ आहेत व रोज आरतीच्या वेळी तो भक्तीभावाने त्या मंत्राचे गुणगानही करतो, परमेश्वर हा एकच असतो अशी शिकवण बालपणापासून दिली जाते तरीही धर्माच्या नावाखाली आपण विभागल्या जातो.मला जेव्हा कोणती संकट येतात तेव्हा मी गणेशाची आराधना करतो त्यावेळी माझ्या आयुष्यात आलेल्या संकटाचे निवारण झाल्याची परीचिती आल्याचेही सिझेल सांगतो.

लहानपणी स्वतः मातीची गणेश मूर्ती साकारत सुरूवात केलेला हा उत्सव आज गल्लीतील सर्वचा आवडता उत्सव झाला असून, परिसरातील लोक त्यांच्या घरी सहभागी होतात व मोठया उत्साहात एकत्र येऊन साजरा करतात. दरवर्षी बाप्पांना निरोप देण्यापूर्वी महाप्रसादाचे आयोजन करुन ढोल ताशांच्या गजरात नाचत-नाचत श्री गणेशाच विसर्जन केल्या जाते. विविध जाती धर्माने नटलेला व धर्मनिरपेक्ष देशात आपण वावरत असताना गणेश उत्सव हा हिंदूचा सण मुस्लिम घरात जेव्हा अशा पद्धतीने साजरा होतो तेव्हा तो समाजासाठी दिशादर्शक नक्कीच ठरणार हे मात्र निश्चित..!

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles