प्रसिद्ध कवयित्री वसुधा नाईक यांचा वाढदिवसात उत्साहात साजरा

प्रसिद्ध कवयित्री वसुधा नाईक यांचा वाढदिवसात उत्साहात साजरा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

पुणे: मराठीचे शिलेदार संस्था नागपूरच्या तसेच प्रसिद्ध कविता संग्रह ‘गुंजन मनीचे’ कार ज्येष्ठ कवयित्री वसुधा नाईक, पुणे यांचा वाढदिवस आज २/०९/२०२२ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

पण या दिवसाचे महत्व जरा हटके असल्याचे वसुधा नाईक म्हणाले. त्यांनी सांगितले की, ‘काल मी माझ्या घरी ज्या मावशी काम करतात त्यांनाच काही महिलांना घरी बोलवण्याचे आमंत्रण दिले. त्याही महिला होतकरू, प्रामाणिक, संसारासाठी काम करणार्‍या आहेत. यांना बोलावून मी माझा वाढदिवस साजरा केला. माझ्या मुली कोमल, शीतल ,पती वैभव, मुलगा आदित्य ,जावई सागर, अभिषेक , घरातील सर्वजण दीर, जाऊबाई या सर्वांची साथ खंबीरपणे असल्याचे नाईक यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्यात की, जरा हटके केलेला माझा वाढदिवस खूप काही सांगून गेला. माणुसकी, प्रेम, जनरीत सर्व काही.. त्या भगिनींच्या हातून ओवाळून घतले. केक कापला. सर्वांच्या मुखकमलावर आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. सर्वांना गिफ्ट दिले. हळदी, कुंकू लावून थोरांना नमस्कार केला ..हे सर्व करताना मानसिक समाधान खूपप मिळाले.

जाताना या भगिनी जे वाक्य बोलल्या त्या वाक्याने मनात घर केले. “बाई, आज तुम्ही आम्हांला खूप मान दिलात, असा मान या समाजात नाही मिळत हो आमच्यासारख्या महिलांना.” खरच या वाक्याने मन भरून आले. असा हा आगळावेगळा माझा वाढदिवस साजरा करताना नातवंडेही साथीला असल्याचे नाईक म्हणाल्यात.

थोर महिलांनी तोंड भरून दिलेले आशीश , आईचे आशीश ,सर्व मित्रमैत्रिणींनी दिलेल्या शुभेच्छा ,सकधीही समोर भेटलो नाहीत अशा सर्वांनी खूप छान शब्दफुलांची बरसात केली.असा वसुधा नाईक यांचा वाढदिवस कुटुंबियांना आंतरीक समाधान देवून गेला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles