
‘हिंदुस्तानी’चे प्रमुख गुलामनबी आझाद; केली नव्या पक्षाची घोषणा
जम्मू काश्मीर: कॉंग्रेसचे माजी नेते गुलामनबी आझाद यांनी आज आपल्या समर्थकांचा येथे मेळावा आयोजित करून कॉंग्रेसवर सडकून टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की आम्ही आमच्या रक्ताने कॉंग्रेस बनवली आहे, केवळ ट्विटर किंवा कॉम्प्युटरच्या आधारे कॉंग्रेस उभी राहणार नाही, त्यामुळेच आज कॉंग्रेसची ही हालत झाली आहे असे त्यांनी म्हटले आहे.
आजच्या सभेत ते आपल्या नवीन राजकीय पक्षाची घोषणा करतील असे सांगितले जात होते. पण तशी अधिकृत घोषणा यावेळी करण्यात आली . जनतेला विचारून आम्ही आमच्या पक्षाचे नाव निश्चीत करू हे नाव हिंदुस्थानी लोकांना आपलेसे वाटले पाहिजे अशी आपली इच्छा आहे असे ते म्हणाले. जम्मू काश्मीरला पुर्ण राज्याचा दर्जा मिळाला पाहिजे, येथील जमीनी आणि नोकऱ्यांमध्ये स्थानिक लोकांनाच संधी मिळाली पाहिजे अशी आमची भूमिका असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. आज झालेल्या सभेत त्यांनी आपल्या पक्षाचे नाव ‘हिंदुस्तानी’ असेल असे जाहीर केले.