😀हसणावळीतील आनंदाचे टॉनिक; सविता पाटील ठाकरे

😀हसणावळीतील आनंदाचे टॉनिक; सविता पाटील ठाकरेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

जन्म आणि मृत्यू या दोन टोकांच्या मध्ये पकडून नियतीने चालवलेली आपल्या साऱ्यांची फसवणूक एकदा लक्षात आली की त्यातून सुटायला आपली आणि आपुलकीने भोवताली जमणाऱ्या माणसांची “हसवणूक” करण्यापलीकडे आणखी काय करायचं?

🔹सन 1968 साली “हसवणूक” या पुस्तकाच्या प्रस्तावनेत पुलंच्या या हस्तलिखित ओळी वाचल्या आणि जीवनातील हसायचं, हसवण्याचं महत्त्व आपोआप अधोरेखित झालं. हसणं ही निसर्गाने आपल्याला दिलेली अनोखी देणगी आहे आणि आपण ती जेव्हा आणि जिथं हवी तशी उधळू शकतो. ही एक अशी प्रक्रिया आहे की जी माणसाला बौद्धिक, मानसिक, शारीरिक , आत्मिक, सारं सुख देते तेही अगदी भरभरून……

“हसणं भक्ती आहे तर
हसवणं मुक्ती आहे..
स्मित करणे हा जप आहे
तर खुलवणे तप आहे.”

हे आहेही.. मोठं खट्याळ कधी खळखळून, कधी गालातल्या गालात, कधी लाजुन, तर कधी अगदी आतून तेही अंतकरणाच्या कोपऱ्यातून तेव्हाच तर या ओळी …

“लाजून हसणं पण हसून ते पाहणे…
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे….”

तमाम मराठी रसिकांच्या ओठात कायमच गुणगुणत असतात….!!!

हसणे, हसवणे हे टॉनिक आहे . आजचे खडतर जीवन सुखकर बनविण्यासाठी,ते एक प्रभावी औषध आहे.तेव्हाच तर जॉर्ज मेरेडीथ म्हणतात विचारयुक्त हास्य निर्माण करणे हीच सुखात्मिकतेची खरी कसोटी आहे.

👍असे हसणे, हसवणे आपणास व दुसऱ्यासही फायदेशीर आहे,तो एक उत्तम व्यायाम, हृदयविकारावरचे औषध, मेंदूचा वेग वाढवण्याचे सोपे माध्यम, फुफ्फुस शुद्ध करणारा, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा, वेदना कमी करणारा,सर्वात सोपा व स्वस्त उपाय आहे .

🙏’हास्य’ एक अनुभूती आहे, जी बहुदा विनोदाने निर्माण होते. हास्यामध्ये पर्यवासीत होणाऱ्या जीवनविषयक सुखात्म जाणीवेची प्रचीती देणारा धर्म म्हणजे विनोद… असा विनोद साहित्यातून अविष्कृत करताना अपरिहार्यपणे मानवी जीवनातील अनुभवाचे चित्रण कधीतरी करणे गरजेचे आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा राहुल सरांनी बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेसाठी ‘हसवणूक’ हा विषय दिला. अन् तमाम मराठी सारस्वतांची लेखणीही खुदकन हसली आणि हसून हसून खूप सुंदर बरसली….

💦विविध अंगी काव्य माहिती खूपच सुंदर सजली अनेकांनी वेगवेगळ्या विषयांना आपापल्या परीने न्याय देण्याचा प्रयत्न केला तेव्हा तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व अभिनंदन..!!

✍️पण थोडं काही…..

😀सुखात्म जाणीव निर्माण करणारा आशय असणे एवढेच वैशिष्ट्य विनोदाच्या निर्मितीला पुरत नाही . बालकवींची ‘फुलराणी’ ही कविता सुखात्म जाणीव निर्माण करणारी निश्चितपणे आहे मात्र तिला विनोदी कविता म्हणता येणार नाही. म्हणजेच आशयाच्या जोडीने विनोद निर्मितीसाठी दुसरे एक वैशिष्ट आवश्यक असते ते म्हणजे अभिव्यक्तीचे वैशिष्ट्य होय. ते असेले, की काव्य खऱ्या अर्थाने फळते फुलते बहरते…!!

सौ. सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक/प्रशासक/ कवयित्री/समीक्षक/मुख्य सहसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles