भारताच्या नीरज चोप्राची डायमंड लीग स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी

भारताच्या नीरज चोप्राची डायमंड लीग स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

स्वित्झर्लंड : बहुप्रतिष्ठित डायमंड लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. स्वित्झर्लंडच्या झुरिचमध्ये अ‍ॅथलेटिक्समधल्या प्रतिष्ठेच्या डायमंड लीग स्पर्धेची मेगा फायनल पारपडली असून डायमंड लीगच्या भालाफेक प्रकारात हा किताब पटकावणारा नीरज चोप्रा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. नीरज चोप्राने झुरिच येथे झालेल्या फायनलमध्ये ८८.४४ मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह विजेतेपद पटकावले.

मागील महिन्यात लुसाने डायमंड लीग (Diamond League) स्पर्धेत त्याने ८९. ०८ मीटर अंतरावर भाला फेकत प्रथम स्थान पटकावलं होतं आणि झुरिचमधील प्रतिष्ठेच्या डायमंड लीग स्पर्धेत धडक मारली होती. या डायमंड लीगच्या फायनलमध्ये नीरजची सुरुवात चांगली झाली नाही. त्याचा पहिला थ्रो फाऊल होता. दुसऱ्या प्रयत्नात त्याने ८८. ४४ मीटर अंतरावर भाला फेकला. तिसऱ्या प्रयत्नात ८८. ०० मीटर, चौथ्या प्रयत्नात ८६. ११ मीटर तर पाचव्या प्रयत्नात ८७. ०० मीटर आणि सहाव्या प्रयत्नात ८३. ६० मीटर भाला फेकला. या अंतिम फेरीत झेक प्रजासत्ताकचा जेकोब ८६. ९४ मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह दुसरा, तर जर्मनीचा ज्युलियन वेबर ८३. ७३ मीटर फेकसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला. नीरज चोप्राला मात्र अनुक्रमे चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

नीरजने२०२१ मध्ये ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण,२०१८ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण, २०१८ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण, २०२२ मध्ये जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकून भारताचा गौरव वाढवला आहे. मात्र राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (CWG 2022) मांडीला दुखापत झाल्यानं नीरज चोप्राला एक महिना मैदानापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. अंतिम फेरीत ऐतिहासिक रौप्य पदक पटकावताना नीरजला दुखापत झाली होती. त्यामुळे तो बर्मिंगहम येथे २८ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तो खेळू शकला नाही.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles